महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. भुजबळ यांच्यासोबतच त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याही कोठडीत तितकीच वाढ करण्यात आली. भुजबळ काका-पुतणे गेल्या दीड महिन्यांपासून तुरूंगात आहेत.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर देखील आज सुनावणी झाली. मात्र, कोणताही निकाल न्यायालयाकडून देण्यात आला नाही. जामीन अर्जावरील पुढील सुनावणी १३ मे रोजी होणार आहे.