‘आदर्श’ सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआय प्रमुख रणजीत सिन्हा यांना समन्स बजावण्याची मागणी विशेष न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर-पाटील व सुशीलकुमार शिंदे यांनी घोटाळ्यासंदर्भात आपली भेट घेतली नसल्याचे सिन्हा यांनी न्यायालयासमोर येऊन सांगावे, यासाठी त्यांना समन्स बजावण्याची मागणी करण्यात आली होती. ‘आदर्श’प्रकरणी निलंगेकर-पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाणे येथील प्रवीण वाटेगावकर यांनी एका अर्जाद्वारे सीबीआय न्यायालयाकडे केली आहे. पाटील यांनीही महसूल मंत्रीपदी असताना सोसायटीला बेकायदा परवानग्या दिल्या होत्या, असा आरोप वाटेगावकर यांनी केला आहे. त्या अर्जावर शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस वाटेगावकर यांनी सीबीआय प्रमुखांना समन्स बजावण्याची मागणी केली.