21 January 2021

News Flash

‘कोर्ट’साठी सरकारने आर्थिक मदत करावी..

‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे.

विशेष गाजलेल्या ऑस्ट्रियातील गुडनाईट मॉमी, ब्राझीलचा द सेकंड मदर, इराणचा महंमद- द मेसेंजर ऑफ गॉड, पॅलेस्टाईनचा द वाँटेड १८, पोलंडचा ११ मिनिटस, पोर्तुगालचा अरेबियन नाईट व्हॉल्यूम २, द डेझोलेट वन हे चित्रपट प्रवेश मिळवू शकले नाहीत.

‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठीची एकूण प्रक्रिया खर्चिक असून त्यासाठी ‘कोर्ट’च्या चमूला राज्य शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे.ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनापासून ते पुरस्कार जाहीर होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी ‘कोर्ट’च्या चमूला त्यासाठी काम करावे लागणार आहे. मराठी चित्रपट अनेकदा या प्रक्रियेत आर्थिक निधीअभावी मागे पडतात. तशी वेळ ‘कोर्ट’वर येऊ नये, त्यासाठी ही आर्थिक मदत करण्यात यावी, असे शेवाळे यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2015 6:01 am

Web Title: court movie need financial help
टॅग Court
Next Stories
1 महाराष्ट्रातील गिधाडांना वाचविण्यासाठी विशेष मोहीम!
2 आमदाराचे अनधिकृत बांधकाम पाडणार!
3 मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉकला सुटी
Just Now!
X