News Flash

सलमानविरोधातील बातम्या दाखविण्यास वृत्तवाहिनीस मज्जाव

सलमान खानविरुद्ध बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे नमूद करीत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी ‘एबीपी न्यू

| April 26, 2013 04:50 am

सलमान खानविरुद्ध बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे नमूद करीत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी ‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीस असे वृत्त प्रसिद्ध करण्यास गुरुवारी मज्जाव केला.
‘हिट-अ‍ॅण्ड-रन’ खटल्याची सुनावणी लांबविण्यासाठी सलमानने पोलिसांना पैसे दिल्याचा आरोप करणारे वृत्त वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले होते. त्या विरोधात सलमानने उच्च न्यायालयात धाव घेत वृत्तवाहिनीने यासाठी लेखी वा वृत्तवाहिनीवरून माफी मागण्याची मागणी केली आहे. तसेच अशा बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध न करण्याचे आदेश देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांच्यासमोर सलमानच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने प्रथमदर्शनी तरी वृत्तवाहिनीने सलमानची बदनामी करणारे वृत्त प्रसिद्ध केल्याचे मत नोंदवले. तसेच त्याच्याविरुद्ध सत्र न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याच्या सुनावणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही नमूद करीत सलमानला दिलासा दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 4:50 am

Web Title: court ordered to channel to stop showing news against samlan khan
टॅग : Court,Salman Khan
Next Stories
1 अ‍ॅण्टॉप हिल येथे पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार
2 अबू जुंदाल म्हणतो, कसाबच्या कोठडीत ठेवू नका!
3 डोंबिवलीत अनधिकृत इमारतींचा पाणी, वीजपुरवठा पालिकेकडून खंडित
Just Now!
X