आयंबील उत्सवानिमित्त १९ ते २७ एप्रिलदरम्यान जैन मंदिरात प्रसादाची पाकिटे घेण्यासाठी मंदिरात जाण्यास परवानगी देण्याची मागणी जैन धर्मियांच्या दोन ट्रस्टतर्फे गुरुवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

न्यायमूर्ती सुरेश गुप्ते आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या सुटीकालीन खंडपीठापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. नऊ दिवसांच्या कालावधीत मंदिर खुले करण्याची किंवा तेथे येऊन भाविकांना प्रसादाचा आस्वाद घेऊ देण्याची आमची मागणी नाही. तर मंदिराच्या आवारातून या प्रसादाची पाकिटे घेऊन जाण्यास परवानगी मागत आहोत, असे ट्रस्टच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.