News Flash

लोकल अपघातांची न्यायालयाकडून गंभीर दखल

उपनगरीय लोकलमधील गर्दीमुळे होणाऱ्या मृत्यूंची उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा गांभीर्याने दखल घेतली.

लोकल अपघातांची न्यायालयाकडून गंभीर दखल
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कारवाईसाठी स्थानकांवर जवान तैनात ठेवावेत.

उपनगरीय लोकल सेवा चालविण्याची उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना
उपनगरीय लोकलमधील गर्दीमुळे होणाऱ्या मृत्यूंची उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा गांभीर्याने दखल घेतली. त्यामुळे त्याला आवर घालण्यासाठी रेल्वे मंत्रालयावर अवलंबून राहण्याऐवजी राज्य सरकार मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने उपनगरीय लोकल सेवा स्वत: का चालवत नाही, असा सवाल न्यायालयाने केला. रेल्वे मंत्रालयानेच ही जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवावी, असे सुचवत न्यायालयाने या सूचनेबाबत उत्तर दाखल करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. एवढेच नव्हे, तर लोकलमधील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यालय व शाळा-महाविद्यालयांच्या वेळा आणि साप्ताहिक सुट्टय़ांचे दिवस बदलण्याचाही गांभीर्याने विचार करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
उपनगरीय लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या ए. बी. ठक्कर यांच्या पत्राचे न्यायालयाने जनहित याचिकेत रूपांतर केले आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठासमोर त्यावर बुधवारी सुनावणी झाली. त्या वेळेस लोकलवरील गर्दीवर नियंत्रण आणण्यात रेल्वे प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे न्यायालयाने पुन्हा एकदा सुनावले. शिवाय प्रत्येक वेळी रेल्वे मंत्रालयावर अवलंबून का राहावे लागत आहे, असा सवालही न्यायालयाने केला. लोकलच्या गर्दीमुळे मुंबईकरांचे मृत्यू होत आहेत आणि ही गर्दी दिवसेंदिवस वाढत असून लोकलमधून मृत्यू होण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता तरी जागे व्हावे आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा टोला न्यायालयाने हाणला.
अन्य सूचना..
* गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कारवाईसाठी स्थानकांवर जवान तैनात ठेवावेत.
* लोकलच्या डब्यातील फुटबोर्डवरील खांब रबरी करावा.
* पालिकेने लोकलचे विशेष मार्ग प्रायोगिक तत्त्वावर चालवावेत.
* रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालिकेने मोठय़ा बेस्ट बसऐवजी लहान बस चालवाव्यात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2015 2:33 am

Web Title: court serious on local train accidents
Next Stories
1 कल्याण ते सीएसटी प्रवास आता लांब पल्ल्याच्या गाडीतून
2 ‘दत्तक वस्ती योजना’ असतानाही गावदेवीत घाणीचे साम्राज्य
3 ‘विशिष्ट खाद्यसवयी खासगी आयुष्याच्या अधिकारात नाहीत’
Just Now!
X