News Flash

‘पीसीपीएमएल’ला न्यायालयाचा दणका

कुपोषणग्रस्त मुलांसाठी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीसीपीएमएल) १९९७ पासून प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त अधिभारापोटी जमा केलेला निधी सरकारकडे जमा न करता तो वापरल्याचे खुद्द कंपनीनेच

| August 2, 2014 03:41 am

कुपोषणग्रस्त मुलांसाठी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीसीपीएमएल) १९९७ पासून प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त अधिभारापोटी जमा केलेला निधी सरकारकडे जमा न करता तो वापरल्याचे खुद्द कंपनीनेच यापूर्वी मान्य केले आहे. त्यामुळे १९९७ पासून चुकविलेला हा निधी सव्याज म्हणजेच ५७ कोटी रुपये दोन महिन्यांत सरकारकडे जमा करण्याचे आदेश न्यायालायने कंपनीला दिले आहेत. एवढेच नव्हे, तर कंपनीने प्रवासी अधिभारापोटी प्रत्येक तिकिटावर आकारलेले पैसेही १९९७ पासून जमा केलेले नाहीत. त्यामुळे त्याचेही ११९ कोटी कंपनीने सहा महिन्यांत दंडासह जमा करण्याचे आदेश न्यायालयाने देत कंपनीने ते भरले नाहीत तर कठोर कारवाई करण्याचेही न्यायालयाने सरकारला बजावले आहे.  
या निधीमध्ये घोटाळा केला जात असल्याचा आरोप करणारी आणि त्याच्या चौकशीची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 3:41 am

Web Title: court slams pcpml
Next Stories
1 बेदरकार वाहनचालकांच्या शिक्षेत वाढ होण्याची शक्यता
2 केळकर अहवाल खुला करणार
3 पालघर जिल्हा पर्यटन केंद्र विकसित करणार – मुख्यमंत्री
Just Now!
X