News Flash

अर्जावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निर्णय

मुंबईतील १९९३ मधील बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

| July 27, 2015 04:46 am

गेल्याच आठवड्यात 'लोकसत्ता'ने आयोजित केलेल्या 'लोकसत्ता दृष्टिकोन - गुगल हॅंगआऊट' कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे सांगितले होते.

मुंबईतील १९९३ मधील बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीनंतरच त्याच्या दयेच्या अर्जाबाबात राज्यपाल सी. विद्यासागर राव हे निर्णय घेणार आहेत. याकूब मेमन याने राज्यापालांकडे दयेचा अर्ज केला असून तो फेटाळून लावावा, अशी शिफारस खुद्द राज्य शासनानेच राज्यापालांना केली आहे. मात्र सोमवारी सर्वोच्च न्यायालयात त्याच्या याचिका अर्जावर सुनावणी होणार असल्याने तोपर्यंत वाट बघण्याचा निर्णय राजभवनाने घेतला असल्याचे समजते.

मान्यवर सरसावले
याकूबला फाशी देऊ नये यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर सरसावले आहेत. शत्रुघ्न सिन्हा, राम जेठमलानी, याशिवाय मणिशंकर अय्यर, राष्ट्रवादीचे माजीद मेमन, सीताराम येचुरी, डी. राजा, एचके दुआ, पानचंद जैन, न्या. एच.एस. बेदी, पी.बी. सावंत, एच. सुरेश यांनी फाशीला विरोध केला आहे.

‘याकूबला फाशीच हवी’
सलमानने याकूब मेमनच्या फाशीचा विरोध करणे म्हणजे, एका आरोपीने दुसऱ्या आरोपीचा बचाव करण्याचा हा प्रकार आहे. सलमान सध्या जामिनावर असताना त्याने असे वक्तव्य करणे हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. मुंबईत बॉम्बस्फोटात शेकडो निष्पापांचे बळी घेणाऱ्या याकूबला फाशी झालीच पाहिजे, असे मत स्वामी यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 4:46 am

Web Title: court will take decision on menon
टॅग : Court
Next Stories
1 सलमानच्या ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणाची सुनावणी ३० जुलैला
2 सलमानने आपल्या ट्विटबाबत मागितली माफी
3 मरे विस्कळीत
Just Now!
X