मुंबई : मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी पुन्हा एकदा वाढला असून सध्या सरासरी कालावधी २४३ दिवसांवर गेला आहे. ८१३ नवे रुग्ण आढळले असून १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत रुग्णवाढीचा दर ०.२९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. शुक्रवारी ८१३ नवे रुग्ण आढळल्यामुळे एकूण बाधितांची संख्या २ लाख ८४ हजारांच्या पुढे गेली आहे, तर एका दिवसात १०२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत २ लाख ५९ हजारांहून अधिक म्हणजेच ९१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या केवळ १२,९२६ रुग्ण उपचाराधीन आहेत. मृतांची एकूण संख्या १०,८७१ वर गेली आहे.
राज्यात ५,२२९ नवे रुग्ण
राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ५२२९ नवे रुग्ण आढळले असून १२७ जणांचा मृत्यू झाला. याच काळात ६,७७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. दिवसभरात नाशिक जिल्हा ४८३, पुणे शहर ३५९, पिंपरी-चिंचवड १४८, पुणे जिल्हा २९६, नागपूर शहर ४५३ नवे रुग्ण आढळले.
ठाणे जिल्ह्य़ात १५ जणांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारी ६२४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दिवसभरात १६ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ७२६ इतका झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 5, 2020 2:45 am