05 December 2020

News Flash

कोविड योद्धे वेतनाच्या प्रतीक्षेत

तीन महिने वेतन न मिळाल्याने त्यांना हे काम सोडावे लागले.

(संग्रहित छायाचित्र)

करोना नियंत्रणात सेवा देणाऱ्या४० जणांना तीन महिन्यांपासून वेतन नाही

मुंबई : करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी काही महिन्यांपूर्वी पालिके ने ‘कोविड योद्धा’ नावाखाली काही तरुणांची भरती के ली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे आणि इतर काही कामांमध्ये पालिके ला या तरुणांची फार मोठी मदत होत आहे. मात्र पालिके च्या अंधेरी येथील ‘के  पश्चिम’ विभागाचे ४० कोविड योद्धे गेले तीन महिने वेतनाविना काम करत आहेत.

निखिल कडने आणि त्यांच्या बहिणीने जुलै महिन्यात कोविड योद्धा म्हणून काम सुरू के ले होते. तीन महिने वेतन न मिळाल्याने त्यांना हे काम सोडावे लागले. ‘वेतन तर मिळत नाहीच; पण दर दिवशी १५०-२०० रुपये प्रवासावर खर्च होतात,’ असे निखिल कडने यांचे म्हणणे आहे. गोरेगाव येथून अंधेरी लोखंडवाला या ठिकाणी कामासाठी जाणाऱ्याएका कोविड योद्ध्याला दुचाकीसाठी रोज ५० रुपयांचे पेट्रोल खर्च करावे लागते. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत काम करूनही हाती काहीच पडत नसल्याने एका कोविड योद्ध्याने स्वीगी आणि झोमॅटोतर्फे  घरपोच सेवा देण्याचा मार्ग पत्करला आहे.

एप्रिलपासून काम करणाऱ्याकाही तरुणांना सुरुवातीच्या दोन महिन्यांचे वेतन मिळाले, मात्र त्यानंतर विनावेतनच काम सुरू आहे. यातील बहुतेक तरुण आधीच बेरोजगार आहेत. दिवसाला ५०० रुपये याप्रमाणे महिन्यातील जेवढे दिवस काम असेल तेवढ्या दिवसांचे वेतन दिले जाते. कोविड योद्ध्यांची हजेरी घेणाऱ्या‘नेहरू युवा के ंद्र’ या स्वयंसेवी संस्थेचे माधव सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार या विषयासंदर्भातील फाइल आरोग्य अधिकाऱ्यांकडे दिली आहे, मात्र ती पुढेच पाठवली जात नाही.

आरोग्य अधिकारी डॉ. गुलनार खान यांच्याकडे विचारणा के ली असता त्यांनी साहाय्यक आयुक्तांकडून माहिती घेण्यास सांगितले. साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांना विचारले असता, ‘संबंधितांनी माझी भेट घेत घेतल्यास त्वरित या प्रकरणात लक्ष घालू,’ असे उत्तर त्यांनी दिले. सर्व तरुणांनी वर्सोवा येथील मनसेचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांची भेट घेतली. देसाई यांनी याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क  साधला. ‘थकीत वेतन सात दिवसांत मिळाले नाही तर साहाय्यक आयुक्तांना घेराव घालू,’ असे त्यांनी सांगितले आहे.

वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्याचे काम कोविड योद्धा करतात. त्यांना बाधितांची यादी दिली जाते. बाधितांशी संपर्क  साधून त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, रुग्णालयात दाखल करणे आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात पाठवण्याचे काम हे तरुण करतात. जे नागरिक गृहविलगीकरणात राहाणार असतील त्यांच्याकडून अर्ज भरून घेतला जातो. काही वेळा गरज असूनही रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यास तयार होत नाहीत, अशा वेळी पोलिसांना माहिती द्यावी लागते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:31 am

Web Title: covid warriors awaiting pay akp 94
Next Stories
1 खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर २,३६० रुपयांत!
2 मुंबईत दिवसभरात १,४७० जणांना करोनाची बाधा
3 करोना उपचारांपोटी राज्यात २१०० कोटींचे विमा दावे
Just Now!
X