News Flash

पॉईंटमनने वाचवले मुलाचे प्राण; वांगणी रेल्वे स्थानकातील थरार सीसीटीव्हीत कैद

देव तारी त्याला कोण मारी

‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकात आला. देवदूतासारखा धावून आलेल्या पॉईंटमननं आपला जीव धोक्यात घालून एका चिमुकल्याचा जीव वाचवला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एक सेंकदाचाही वेळ झाला असता तर चिमुल्यासह पॉईंटमनलाही जीव गमवावा लागला असता. मात्र जीव धोक्यात घालून पाईंटमन रेल्वे रुळावर धावत आला आणि चिमुकल्याला जीवदान मिळालं. पॉईंटमन मयूर शेळकेच्या प्रसंगावधानामुळे चिमुकल्याचा जीव वाचला.

वांगणी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर एक अंध महिला मुलासह चालत होती. यावेळी मुलगा प्लॅटफॉर्मच्या कडेला असताना तोल जाऊन रुळावर पडला. ट्रेन अवघ्या सेकंदावर दिसत होती. त्यामुळे अंध महिला कासावीस होऊन आरडाओरड करत होती. ही बाब पाईंटमन मयूर शेळके यांना दिसली. त्याने क्षणाचाही विलंब न करता रुळावर धाव घेतली. एखाद्या चित्रपटातील दृष्य असल्यासारखी प्रत्यक्ष घटना अनेकांच्या काळजाचा ठोक चुकवून गेली. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आला. वांगणी स्थानकावर शनिवारी (१७ एप्रिल) ही घटना घडली. देवदूतासारख्या मयूर शेळकेने त्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. एका सेकंदाचाही विलंब झाला असता तर मयूरलाही जीव गमवावा लागला असता हेही तितकंच खरं. मात्र जीवाची बाजी लावून त्याने चिमुकल्याला जीवदान दिलं.

पाईंटमनन मयूर शेळके याच्या प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या कामगिरीसाठी अनेक जण शाबासकी देत आहेत. त्याच्या कामगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी तोंडात बोटं टाकून खरा देवदूत असल्याच्या कमेंट्स देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 11:40 am

Web Title: cr vangani station pointman save life of child incident catch in cctv rmt 84
टॅग : Cctv,Central Railway,Rail
Next Stories
1 लॉकडाउनसंबंधी अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
2 देशात युद्धजन्य परिस्थिती, दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा – संजय राऊत
3 फडणवीसांच्या तोंडात करोनाचे विषाणू कोंबणार म्हणणाऱ्या शिवसेना आमदाराला नितेश राणेंचं उत्तर; म्हणाले…
Just Now!
X