News Flash

मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

टिटवाळा - आंबिवली दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

टिटवाळा – आंबिवली दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची ठप्प झालेली वाहतूक पूर्वपदावर आली आहे. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास टिटवाळा-आंबिवली दरम्यान रुळाला तडे गेल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. ऐन वर्दळीच्यावेळी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्यानंतर तासाभराने वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली, पण वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यास भरपूर वेळ गेला. मध्ये रेल्वेवरील लोकल सेवा २५ मिनिटे उशीराने सुरू होती. तर, मुंबईच्या दिशेने येणाऱया लांबपल्ल्याच्या गाड्या देखील रखडल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 9:12 am

Web Title: crack in railway track central railway disturb
टॅग : Central Railway,Railway
Next Stories
1 शक्ती मिल भूखंड प्रकरणी अवर सचिवाची बदली
2 पालिकेत दोन्ही काँग्रेस आक्रमक ; सर्वसाधारण सभेत पडसाद उमटण्याची शक्यता
3 ‘महापौर निवासा’त शिवसेनाप्रमुखांचे स्मारक
Just Now!
X