News Flash

करोनाबाधित असूनही सार्वजनिक ठिकाणी फिरल्याप्रकरणी अभिनेत्री गौहर खानविरोधात गुन्हा

अभिनेत्री गौहर खान हिला करोनाची लागण झाल्याचे चाचणी अहवालातून ११ फेब्रुवारीला स्पष्ट झाले.

संग्रहीत

मुंबई : करोनाची लागण होऊनही चित्रीकरणात सहभागी झाल्याप्रकरणी अभिनेत्री गौहर खानविरोधात ओशिवरा पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. पालिकेच्या ‘के पश्चिाम’ विभागाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला आहे.

अभिनेत्री गौहर खान हिला करोनाची लागण झाल्याचे चाचणी अहवालातून ११ फेब्रुवारीला स्पष्ट झाले. त्यानंतर विलगीकरणात राहणे बंधनकारक असतानाही नियमांचे उल्लंघन करून खान सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे एका चित्रीकरणातही ती हजर होती. याबाबत माहिती मिळताच पालिकेचे कर्मचारी रविवारी तिच्या घरी गेले असता दार ठोठावूनही गौहर खान हिने प्रतिसाद दिला नाही. त्याचबरोबर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असताही प्रतिसाद मिळाला नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अखेर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर गौहर खान हिने दार उघडले. त्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का मारला.

याप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, साथरोग नियंत्रण कायदा आणि संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गौहर खान हिला पालिकेच्या विलगीकरण केंद्रात पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 1:38 am

Web Title: crime against actress gauhar khan corona virus infection public place akp 94
Next Stories
1 अनुकंपा तत्त्वावरील नोकरीचे धोरण शिथिल
2 पुरुषोत्तम बेर्डे यांना ‘साहित्य साधना पुरस्कार’
3 सवलतीच्या दरात रंगमंच उपलब्ध करून द्या!
Just Now!
X