News Flash

अभिनेत्री मूनमून दत्ताविरोधात गुन्हा

वाल्मीकी विकास संघाचे अध्यक्ष नरेश बोहिल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.

मुंबई : जातिवाचक संवाद असलेली ध्वनिचित्रफीत प्रसारित करणारी अभिनेत्री मूनमून दत्ताविरोधात अंबोली पोलिसांनी अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार(अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) गुन्हा नोंदवला. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिके त दत्ता प्रमुख भूमिका साकारते आहे. वाल्मीकी विकास संघाचे अध्यक्ष नरेश बोहिल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. बोहिल यांच्या तक्रारीनुसार ११ मेला दत्ता यांची एक ध्वनिचित्रफीत पाहण्यात आली. त्यात जातिवाचक संवाद होते. त्यामुळे वाल्मीकी समाजाच्या भावना दुखावल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 12:52 am

Web Title: crime against actress moonmoon datta akp 94
Next Stories
1 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये मोफत प्रवेशासाठी उत्पन्न मर्यादा आठ लाख
2 करोना प्रतिबंधविषयक  बाबींच्या खरेदीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना
3 मुंबई वीज पारेषण प्रकल्पांसाठी कृती गट नेमावा
Just Now!
X