मुंबई: पाणी सोडण्यावरून झालेल्या वादातून महापालिकेच्या साहाय्यक अभियंत्याला धमकावल्याप्रकरणी भांदुर्गे चांदिवली येथील १६४ प्रभागाचे नगरसेवक हरीश भांदुर्गे यांच्याविरोधात कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पाणी सोडण्यावरून भांदुर्गे यांनी १३ सप्टेंबरला महापालिकेच्या साहाय्यक अभियंत्याला शिवीगाळ केली होती. त्यांनी अभियंत्याला धमकावल्याचा आरोप आहे.  अभियंत्याच्या तक्रारीवरून याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.