News Flash

तरुणाच्या मृत्युप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

मारहाण केल्याप्रकरणी या चौघांना २२ नोव्हेंबरला अटक करण्यात आली.

(संग्रहित छायाचित्र)

वाकोला परिसरात मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. आकाश जाधव (२३) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर नकुल इंगावले, कुणाल इंगावले, भीम आणि रोहित अशी आरोपींची नावे आहेत.

वाकोला येथील गोळीबार ६वा रस्ता परिसरात आकाश कुटुंबासह राहत होता. तो डिलिव्हरी बॉयचे काम करायचा. २ नोव्हेंबरला रात्री १.१५ वाजण्याच्या सुमारास घरी येत असताना आरोपी  नकुल याने साथीदारांसह त्याला लाथाबुक्कय़ांनी मारहाण केली. पोटात दुखू लागल्याने दुसऱ्या दिवशी आकाशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाण केल्याप्रकरणी या चौघांना २२ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. उपचारादरम्यान शुक्रवारी आकाशचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून त्यांच्याविरोधात अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 12:17 am

Web Title: crime against four in connection with the death of a young man abn 97
Next Stories
1 सुमित्रा भावे यांना ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’
2 वीज वितरणाचेही खाजगीकरण
3 मुंबईच्या किमान तापमानात घसरण
Just Now!
X