21 September 2020

News Flash

गायक ‘बादशहा’ची चौकशी

बादशहाच्या इन्स्टाग्राम खात्यांवर काही ठराविक दिवशी चाहत्यांची संख्या अचानकपणे वाढली

बादशाह - ३.१ मिलियन फॉलोअर्स

मुंबई : इन्स्टाग्रामवर सुमारे सहा लाख चाहते गोळा करणारा गायक(रॅपर) आदित्य प्रतिक सिंग सिसोदिया तथा बादशहाकडे गुरुवारी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने चौकशी के ली. चौकशी अपूर्ण राहिल्याने त्याला शुक्र वारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

जाहिराती मिळवण्यासाठी बनावट चाहते निर्माण करणे, कृत्रिमरित्या चाहत्यांची संख्या वाढविणे, अशा बनावट चाहत्यांची खरेदी-विक्रीचा घोटाळा विशेष पथकाने उघड के ला होता. या प्रकरणी काही प्रसिद्ध सोशल मिडीया मार्केटींग कं पन्यांच्या प्रमुखांसह बॉलीवूडमधील प्रभावशाली व्यक्तींची चौकशी सुरू आहे. तसेच अनेक प्रभावशाली व्यक्तींच्या इन्स्टाग्राम खात्यांची तांत्रिक झाडाझडती या पथकाकडून सुरू आहे. एखाद्याच्या खात्यावर चाहत्यांची संख्या, प्रतिसादाचे प्रमाण(लाईक, व्हयू) अचानकपणे वाढले असेल तर त्या व्यक्तीला पथक चौकशीसाठी बोलावते. त्यातूनच बादशहाला समन्स जारी करून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. गुरुवारी तीन तास त्याच्याकडे चौकशी के ली गेली.पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन वाझे, नितीन लोंढे आणि प्रकाश होवाळ या अधिकाऱ्यांनी बादशहासमोर सुमारे २५० प्रश्न ठेवले. त्यापैकी निम्म्या प्रश्नांची उत्तरे त्याने दिली. शुक्र वारी उर्वरित प्रश्नांची उत्तरे मिळवली जातील, असे सांगण्यात आले. बादशहाच्या इन्स्टाग्राम खात्यांवर काही ठराविक दिवशी चाहत्यांची संख्या अचानकपणे वाढली. तसेच त्याने जाहीर के लेल्या एका ध्वनिचित्रफित साडेसात कोटी व्यक्तींनी पाहिली, असेही सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 2:59 am

Web Title: crime branch investigate singer baadshah over fake social media followers zws 70
Next Stories
1 सागरी किनारा मार्गचा भराव सुरक्षित
2 रेल्वे-बेस्टला फटका
3 शार्कच्या पिल्लांच्या मासेमारीत वाढ
Just Now!
X