News Flash

चेंबूरमध्ये करोना रुग्णावर गुन्हा दाखल

चेंबूर परिसरात करोनाची लागण झालेला एक रुग्ण घराबाहेर फिरत होता.

चेंबूरमध्ये करोना रुग्णावर गुन्हा दाखल
(संग्रहित छायाचित्र)

करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबई पालिकेने नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. चेंबूर परिसरात करोनाची लागण झालेला एक रुग्ण घराबाहेर फिरत होता. या रुग्णाविरोधात गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

चेंबूरच्या अतुर पार्क या उच्चभ्रू परिसरात हा रुग्ण पत्नी आणि मुलीसह राहतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या मुलीला करोनाची लागण झाली होती. दोन दिवसांपूर्वी आलेल्या अहवालात दोघा पती-पत्नीला देखील करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यांना गंभीर लक्षणे नसल्याने पालिकेने घरातच त्यांच्यावर उपचार सुरू केले.

मात्र पालिका कर्मचाऱ्यांना आरोपी आणि त्यांचे कुटुंबीय सहकार्य करत नव्हते. याच दरम्यान करोनाची लागण झालेला व्यक्ती बाहेर फिरत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पालिका अधिकाऱ्यांनी खात्री करून घेतल्यानंतर संबंधिताविरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रात दाखल केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 12:34 am

Web Title: crime filed against corona patient in chembur abn 97
Next Stories
1 बालसंगोपन योजनेच्या अनुदानात वाढ
2 मुंबई पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल ऑउट’
3 मुंबईत १,०५१ नवे रुग्ण
Just Now!
X