29 March 2020

News Flash

चार लाख मास्क हस्तगत

येथील एका गोदामात मास्कचा साठा करण्यात आल्याची माहिती सहार आणि विलेपार्ले पोलिसांना मिळाली.

संग्रहित छायाचित्र

सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई

मुंबई : करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंच्या साठेबाजांवर पोलिसांसह शासकीय यंत्रणांनी लक्ष केंद्रीत केले आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सहार परिसरातील एका गोदामातून कोटय़वधींचे मास्क हस्तगत केले.

येथील एका गोदामात मास्कचा साठा करण्यात आल्याची माहिती सहार आणि विलेपार्ले पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या संयुक्त पथकाने गोदामावर छापा टाकला. तिथे मास्कचे दोनशे खोके आढळले. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून अटक केली. पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार चार लाख मास्क हस्तगत करण्यात आले. त्याची किंमत एक कोटींहून अधिक असावी.

मंगळवारी गुन्हे शाखेने विलेपार्ले, भिवंडी येथील गोदामांमध्ये छापा घालून १४ कोटी रुपये किमतींचा सुमारे २५ लाख मास्कचा साठा हस्तगत केला. हा साठा आखाती देशांत विकून नफा कमावण्याचा साठेबाजांचा बेत होता. आयात निर्यात ठप्प असल्याने हा साठा स्थानिक बाजारपेठेत स्वस्तात विकण्याऐवजी साठेबाज वाट पाहात होते. मास्क, सॅनेटायझरचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये सहभाग आहे. सद्यस्थितीत या वस्तूंची साठेबाजी गुन्हा ठरतो, असे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:03 am

Web Title: crime news mask black market second day big action akp 94
Next Stories
1 कार्यालयातून दूरध्वनी आला अन् दुबई गाठली
2 तीन तासात आढळले सहा नवे रुग्ण, महाराष्ट्रात आता १२२ करोनाग्रस्त
3 Big Bazaar देणार ‘लॉकडाउन’ काळात ‘होम डिलिव्हरी’; पाहा तुमच्या विभागातला फोन नंबर…
Just Now!
X