News Flash

पाच लाखांसाठी मुलीला विकणा-या आईला अटक

भाचीचे लग्न थाटामाटात करण्यासाठी पैसे उभाण्याकरिता पोटच्या मुलीची विक्री

केवळ काही पैशांसाठी आपल्या अल्पवयीन मुलीला विकणा-या आईला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या भाचीचे लग्न थाटामाटात करण्यासाठी पैसे उभे करण्याकरिता पोटच्या मुलीची विक्री करण्यासाठी सदर महिला ठाण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवंडी येथे राहणारी ही महिला आपल्या १६ वर्षीय मुलीला घेऊन ठाण्यात देहविक्रीसाठी घेऊन आली होती. तिला या पैशातून आपल्या बहिणीच्या मुलीचे लग्न लावायचे होते.  दरम्यान, पोलिसांनी या महिलेला मुलीचा सौदा करताना एका हॉटेलमध्ये अटक केली. ही महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याचीही माहिती समोर आली आहे. या महिलेची तीन लग्नं झाली असून तिला तीन मुली आहेत. पीडित मुलगी ही तिच्या पहिल्या पतीपासून झाली होती. दोन वर्षांपूर्वीच या निष्ठूर आईने आपल्या मुलीला देहविक्री करण्यास भाग पाडले होते. ठाणे गुन्हे शाखेच्या महिला व्यापार प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना पोटच्या मुलीच्या विक्रीसाठी मुंबईतील महिला ठाण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, लुईसवाडी परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सदर महिलेविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 2:07 pm

Web Title: crime news mother trying to sell her daughter arrested by police in thane
Next Stories
1 मुलांच्या हाती गाडी द्याल तर खबरदार!
2 भांडण सोडविण्यास गेलेल्या मध्यस्थाची हत्या
3 परदेशी तरुणीचा विनयभंग करणारा टॅक्सीचालक अटकेत
Just Now!
X