23 February 2020

News Flash

पोलिसाला मारहाण

गुरुवारी रात्री रमाबाई कॉलनी परिसरात हा प्रकार घडला.

मुंबई : परिसरात गस्त घालत असलेल्या पंतनगर पोलीस ठाण्याच्या एका पोलीस शिपायाला चौघांनी बेदम मारहाण केली. गुरुवारी रात्री रमाबाई कॉलनी परिसरात हा प्रकार घडला.

घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी परिसरातील एका घरामध्ये मोठय़ा प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याची माहिती पंतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अनिल आहेर यांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास ते पंतनगर परिसरात गेले होते; परंतु आरोपींनी आहेर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यामधील सोनू ऊर्फ जमीर शेख या आरोपीने आहेर यांच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून त्यांना गंभीर जखमी केले आहे. पंतनगर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

First Published on February 15, 2020 12:15 am

Web Title: crime news mumbai police fight four men fight police drug addicted item akp 94
Next Stories
1 अग्निसुरक्षा नसल्यास आस्थापनांना टाळे
2 खरेदीवर बक्षिसे जिंकण्यासाठी शेवटचे दोन दिवस
3 पूलबंदीमुळे वाहनांची रखडपट्टी
Just Now!
X