विवाहबाह्य संबंधांतून हत्या; कर्नाटक-बिहारमधून आरोपी अटकेत

मुंबई : पश्चिाम उपनगरातून बेपत्ता झालेल्या तरुणाची हत्या झाल्याचे महिनाभराने उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत या तरुणाच्या मारेकऱ्यांना बिहार, कर्नाटकमधून अटक के ली. दक्षिण मुंबईतील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील पाण्याच्या टाकीतून मृत तरुणाचा सांगाडाही हस्तगत करण्यात आला आहे. हत्या झालेल्या तरुणासोबत एका महिलेचे विवाहबाह््य संबंध आहेत, या संशयातून तिच्या पतीने ही हत्या केल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्याने दिली.

मृत तरुण बेपत्ता असल्याची तक्रार १६ मे रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. ओशिवरा पोलिसांनी शोधाशोध सुरू के ली. मात्र या तरुणाचा कोठेच थांगपत्ता लागत नसल्याने शोधमोहीमही थंडावली. दरम्यान, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त नितीन अलकनुरे, प्रभारी पोलीस निरीक्षक घन:श्याम नायर आणि पथकास हा तरुण बेपत्ता नसून त्याची हत्या करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्याआधारे गुन्हे शाखेच्या कु र्ला कक्षाने या प्रकरणाची चौकशी सुरू के ली. बेपत्ता तरुणाबाबत माहिती मिळवत असताना पथकास बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात राहाणारा आणि दक्षिण मुंबईत मजुरी करणाऱ्या सुरेंद्र मंडल याची माहिती मिळाली. पत्नीसोबत या तरुणाचे अनैतिक संबंध आहेत, असा सुरेंद्रला संशय होता. त्यावरून सुरेंद्रने त्याला धमकावले होते. हा धागा पकडून कु र्ला कक्षाने सुरेंद्रबाबत माहिती मिळवून त्यास मधुबनी येथून ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबूल केला.  मृत तरुण आणि सुरेंद्र एकाच गावचे असल्याने एकमेकांना परिचित होते. मे महिन्यात सुरेंद्रने शंभू, राम कु मार आणि विजय कु मार या तीन साथीदारांसोबत मृत तरुणाच्या हत्येचा कट आखला. सुरेंद्रने या तरुणाला मुंबईत बोलावून घेतले. तो मुंबईत येताच त्याचे अपहरण करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भागातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेले. तेथे त्याची निर्घृण हत्या के ली. मृतदेह सापडू नये यासाठी चौघांनी तो इमारतीच्या तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीत दडवला.