अनैतिक व्यवहार चालत असल्याचे कारण पुढे करीत ‘स्पा’वर धाड टाकून दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या महिला पोलीस निरीक्षकासह पाच जणांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. ‘स्पा’मधील कर्मचाऱ्यांनी या प्रकाराविषयी पोलिसांत तक्रार केली होती. पाचही आरोपींची ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेतील महिला पोलीस निरीक्षक नागिन काळे, दोन हवालदार, एक पोलिसाचा मुलगा आणि एक महिला हे काही दिवसांपूर्वी पवईतील एका ‘स्पा’मध्ये गेले. तेथे त्यांनी छापा घालून खंडणी मागितली.

नाल्यांलगतच्या झोपडय़ांवर कारवाईचे आदेश
मुंबई : मुंबईमधील नाल्यांलगत मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण झाले असून हे अतिक्रमण पालिकेला डोकेदुखी बनले आहे. २४ कि.मी. लांबीच्या नाल्यांलगत १३ हजार झोपडय़ा उभ्या आहेत. या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.