News Flash

रंगमंच कामगारांवर उपासमारीचे संकट

टाळेबंदी शिथिलीकरणामध्ये नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी मिळाली.

अनेक नाटके  सुरू न झाल्याचा परिणाम

मुंबई : नाटकांच्या प्रयोगांना परवानगी मिळाली असली तरीही मर्यादित प्रेक्षकसंख्या, पुन्हा टाळेबंदी होण्याची भीती यामुळे ठरावीक नाटकांचे ठरावीकच प्रयोग सध्या रंगभूमीवर सुरू आहेत. नाटक व्यवसायाच्या या कासवगतीमुळे पडद्यामागील कलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रंगमंच कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून या कामगारांच्या कुटुंबीयांसमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे.

टाळेबंदी शिथिलीकरणामध्ये नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी मिळाली. मर्यादित प्रेक्षकसंख्येत काही नामवंत कलाकारांची नाटके  सुरूही झाली, मात्र आर्थिक अडचणी, प्रेक्षक न येण्याची भीती यांमुळे मोठ्या प्रमाणावर नाटके  अद्याप सुरू होऊ शकलेली नाहीत. या नाटकांवर पूर्णत: अवलंबून असलेले रंगमंच कामगार भविष्याकडे डोळे लावून बसले आहेत. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात विविध नाट्यसंस्थांनी रंगमंच कामगारांना आर्थिक आणि इतर प्रकारची मदत के ली. त्या आधारावर क सेबसे काही महिने कामगारांनी काढले. त्यानंतर आता नाटकांच्या प्रयोगांसोबत आपला रोजगारही पुन्हा सुरू होईल, अशी आशा त्यांना वाटली; जी खरी होऊ शकली नाही.

प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, संगीत संयोजक इत्यादी रंगमंच कामगार गेली अनेक वर्षे स्वत:ला झोकू न देऊन रंगभूमीची सेवा करत आहेत. इतर कोणतेही कौशल्य अवगत करण्याची गरज त्यांना कधी जाणवली नव्हती. त्यामुळे टाळेबंदीत एकाएकी रोजगार गेल्यानंतर ‘पुढे काय?’ हा प्रशद्ब्रा त्यांच्यासमोर ‘आ’ वासून उभा ठाकला. काहींनी भाजीविक्रीसारखे व्यवसाय स्वीकारले आहेत, मात्र त्या क्षेत्राचे आवश्यक तेवढे ज्ञान नसल्याने तिथे फार काळ टिकाव लागण्याची शक्यता नाही. तसेच रंगभूमीशी जडलेले भावनिक नाते आता कांदा-बटाट्यांशी जोडणे शक्य नाही, अशा द्विधा मन:स्थितीत सध्या रंगमंच कामगार आहेत.

टॅक्सी चालवण्याची वेळ

प्रकाशयोजनाकार विजय गोळे एका वेळी ७ नाटकांसाठी काम करत होते, पैकी दोनच सुरू झाली आहेत. सध्या एकांकिका स्पर्धाही होत नसल्याने तो उत्पन्नाचा मार्गही बंद आहे. विजय यांनी टाळेबंदीत भावाची टॅक्सी चालवण्यास सुरुवात के ली. गिरणी संपात जसे गिरणी कामगारांचे हाल झाले तसे सध्या रंगमंच कामगारांचे होत असल्याची भावना संगीत संयोजक आतिश कुं भार यांनी व्यक्त के ली. प्रभाकर वारसे काही वाद्यवृंद आणि नाटकांसाठी रंगभूषाकार म्हणून काम करतात. टाळेबंदीत त्यांच्या पत्नीचीही नोकरी सुटली. नाटक आणि मालिकांमध्ये प्रत्येक कामासाठी माणसे ठरलेली असतात. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या नाटकांकडे धाव घेण्याची सोय नसल्याचे ते सांगतात. २६ तारखेला एक प्रयोग होणार होता, पण पुन्हा टाळेबंदीच्या चर्चेमुळे त्याची शाश्वाती नाही. क्वचित कु ठे काम मिळालेच तरी रंगमंच कामगारांना अल्प मानधनात काम करावे लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 12:24 am

Web Title: crisis of starvation on theater workers akp 94
Next Stories
1 पर्यटकांची देशांतर्गत भटकंतीला पसंती
2 एक कोटींपेक्षा कमी किमतीच्या घरांना मागणी!
3 रेल्वे तिकीट विक्री करणाऱ्या अनधिकृत दलालांविरुद्ध कारवाई
Just Now!
X