News Flash

‘अगदीच शांत झालास’; निशिकांत कामतसाठी अमेय खोपकरांची भावनिक पोस्ट

अमेय खोपकरांनी वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन झालं आहे. हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसह मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत.

आज एकदम शांत झालास, असं म्हणत अमेय खोपकर यांनी अश्रुंना वाट मोकळी केली आहे. सोबतच तुझी सतत आठवण येत राहिलं असंही त्यांनी म्हटलं आहे.


“अजून ‘लय भारी’ काम करायचं होतं मित्रा…तुझ्या इतका शांतचित्त दिग्दर्शक मी तरी अजून पाहिलेला नाही. आता तर अगदीच शांत झालास…अजून काय लिहू? तू तर मनातलं ओळखायचास आणि गूढ हसायचास…तसाच गूढपणे गूढ देशी निघून गेलास. तुझी आठवण सतत येत राहणार दोस्ता.”, अशी पोस्ट अमेय खोपकर यांनी केली आहे.

दरम्यान, निशिकांत कामत हे बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक होते.‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यांसारख्या अनेक बॉलिवूडपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. त्यांना यकृताचा आजार होता, त्यांचं हेच दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 5:16 pm

Web Title: critically acclaimed director nishikant kamat passed away ameya khopkar share emotional post ssj 93
Next Stories
1 वसई : राजावळीतील खदाणीत तरूण बुडाला
2 मिरा-भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांची पालिका अधिकाऱ्याला मारहाण
3 “मोदींनी लंडनमध्ये जाऊन डॉक्टरांचा अपमान केला तेव्हा कुठे होतात?,” संजय राऊत यांचा टीकाकारांना सवाल
Just Now!
X