मुंबई : शहरातील बहुतेक भागांत शनिवारी शुकशुकाट असला तरी मद्यविक्री दुकानांबाहेर (वाइन शॉप) मात्र वर्दळ होती. देशी दारू वगळता भारतात उत्पादित झालेले विदेशी मद्य परवानाधारक ग्राहकांना घरपोच देण्यास महापालिके ची परवानगी होती. त्यानुसार शहरातील सर्व दुकाने सकाळी सातच्या ठोक्याला उघडली.

महाराष्ट्र वाइन शॉप र्मचट्स असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप ग्यानानी यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री मद्यविक्रीस परवानगी देणारे आदेश मिळाल्यावर ते सर्व सभासदांना कळवून दुकान सुरू के ले. घरपोच मद्यसेवेसाठी करोना बाधा नसलेल्या कामगारांना चाचणी अहवाल, मुखपट्टीसह ग्राहकांच्या घरी पाठवले जात होते.

घरपोच मद्यसेवेला परवानगी

मुंबईतील विक्रेत्यांना आठवडाभर सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत परवानाधारक ग्राहकांना मद्यविक्री करण्यास परवानगी असेल. मात्र ग्राहकांना मद्यविक्रीच्या दुकानात सेवन वा खरेदीसाठी जाता येणार नाही.