04 December 2020

News Flash

सीएसएमटी ते अंधेरी-गोरेगाव हार्बर सेवा सुरू

८६ लोकल फेऱ्यांचे नियोजन

८६ लोकल फेऱ्यांचे नियोजन

मुंबई : गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली सीएसएमटी ते अंधेरी, गोरेगाव हार्बर सेवा सोमवारपासून सुरू झाली. या मार्गावर एकू ण ८६ लोकल फे ऱ्या चालविण्यात येत आहेत. टाळेबंदीआधीही तेवढय़ाच फे ऱ्या धावत होत्या.

मुंबई उपनगरीय रेल्वेतून के वळ अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा आहे. नुकतीच सर्वच महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देताना ठरावीक वेळाही निश्चित केल्या गेल्या आहेत. त्यामुळे लोकल गाडय़ांना काहीशी गर्दी होत आहे. टाळेबंदीत सीएसएमटी ते अंधेरी, गोरेगाव हार्बर सेवा पूर्णपणे बंदच होती. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कल्याण, कर्जत या मुख्य मार्गावर, सीएसएमटी ते पनवेल या हार्बर मार्गावर लोकल चालवण्यात आल्या. ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवरील प्रवाशांची मागणी पाहता काही महिन्यांपूर्वी दोन फे ऱ्या सुरू के ल्या. त्यानंतर आणखी चार फे ऱ्यांची भर पाडली आणि हळूहळू त्यातही वाढ के ली. मात्र सीएसएमटी ते गोरेगाव मार्ग बंदच होता. परिणामी सीएसएमटी परिसरात कार्यरत असणाऱ्यांना पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकापर्यंत पायपीट करून अंधेरी किं वा गोरेगावसाठी लोकल पकडावी लागत होती.

सर्वासाठी लोकल प्रवासाची तयारी म्हणून रेल्वेकडून हळूहळू लोकल फे ऱ्यांत वाढ के ली जात आहे. २ नोव्हेंबरपासून मध्य रेल्वेने आणखी ५५२ लोकल फे ऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सात महिन्यांनंतर पुन्हा सीएसएमटी ते अंधेरी, गोरेगाव मार्ग पूर्ववत करण्यात आला. सीएसएमटी ते अंधेरी मार्गावर ४४ लोकल फे ऱ्या आणि सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावर ४२ लोकल फे ऱ्या सुरू करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. यापाठोपाठ बंद असलेल्या अंधेरी ते पनवेल मार्गावरही १८ फे ऱ्या सोमवारपासून धावू लागल्या आहेत. टाळेबंदीआधीही तेवढय़ाच फे ऱ्या होत होत्या. यामुळे अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच महिला प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 1:22 am

Web Title: csmt andheri goregaon harbour service started zws 70
Next Stories
1 शहरबात : बोनसचे वारे..
2 करोनामुळे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाच्या मानधनात घट
3 अनावश्यक तरतुदींमुळे आरोग्य बिघाड
Just Now!
X