08 December 2019

News Flash

CSMT Fob Collapse: महापालिका व रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता कोसळून किमान सहा जण मृत्युमुखी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील अंजूमन इस्लाम शाळेजवळील पादचारी पुलाचा स्लॅब गुरुवारी संध्याकाळी कोसळला.

मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता कोसळून किमान सहा जण मृत्युमुखी पडले तर २८ जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे जे जे उड्डाणपुलाच्या दिशेने जाणारी वाहतूक दीर्घ काळ खंडित झाली होती. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी महापालिका आणि रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड विधानातील कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या पादचारी पुलावरुन सुरुवातीला रेल्वे आणि महापालिका प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानली होती. रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील पूल हा रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत तर टर्मिनसला जोडणारा पूल महापालिकेच्या अंतर्गत येतो, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे होते. तर हा संपूर्ण पूल रेल्वेच्या हद्दीत असल्याचे महापालिकेचे म्हणणे होते.

First Published on March 15, 2019 12:36 am

Web Title: csmt fob collapse fir against bcm railway officials
Just Now!
X