News Flash

‘सीएसएमटी’ स्थानकात ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’

रेल्वेच्या वापरात नसलेल्या डब्यांचे रुपांतर उपाहारगृहात करून तेथे वेगवेगळे खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

रेल्वेच्या जुन्या डब्यांत उपाहारगृह सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडून निविदा

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये येणाऱ्या प्रवाशांना लवकरच रेल्वेच्या डब्यात बसूनच खाद्यानुभव घेता येणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांसह उपनगरी रेल्वेच्या प्रवाशांसाठी रेल्वे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ ही संकल्पना राबवणार आहे. रेल्वेच्या वापरात नसलेल्या डब्यांचे रुपांतर उपाहारगृहात करून तेथे वेगवेगळे खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातून चांगले उत्पन्न मिळवण्याची रेल्वेला आस असून त्यासाठी निविदाप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेवरून मेल-एक्स्प्रेस सुटणाऱ्या सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस येथेही स्टॉल्स असले तरीही आरामात बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल, असे छोटे रेस्टॉरंटही नाही. त्यामुळे अनेकांना स्थानक व टर्मिनसबाहेरील हॉटेल किं वा रेस्टॉरंटवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे हद्दीतच चांगल्या दर्जाचे रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले तर उत्पन्नही मिळेल, या उद्देशाने भारतीय रेल्वेने ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ ही संकल्पना सुरू के ली आहे. मध्य रेल्वेने ही संकल्पना उचलून धरत सीएसएमटी स्थानक हद्दीत त्याची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. वापरात नसलेल्या एका जुन्या रेल्वे डब्याचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर के ले जाईल. हे काम रेस्टॉरंट चालवणाऱ्या कं पनीकडूनच के ले जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने निविदा प्रक्रि याही सुरू के ली आहे.’

‘खाद्यरेल’ची रचना

सीएसएमटीच्या १८ नंबर फलाटाबाहेर (पी.डीमेलो रोडच्या दिशेने)असलेल्या मोकळ्या जागेत हे रेस्टॉरंट उभारले जाईल. यामध्ये ५० जणांना बसण्याची क्षमता असेल. रेल्वे डब्याच्या बाहेरही मोकळ्या जागेत काही खुर्च्या व टेबल ठेवून रेस्टॉरंट चालकाला जागा वापरण्यास मिळू शके ल.  यासाठी कं त्राटदारास २८ लाख रुपयांचा खर्चही येणार आहे. मध्य प्रदेश रेल्वे टूरिझम कॉर्पोरेशनेही रेल कोच रेस्टॉरंट सुविधा सुरू के ली असून त्यालाही चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिली. रेल्वेच्या आसनसोल विभागातही रेस्टॉरंट ऑन व्हील संकल्पना राबवण्यात आली आहे. फे ब्रुवारी २०२० मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सीएसएमटीत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील व लोकल प्रवाशांसाठी ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ हा वेगळाच अनुभव असेल. त्यासाठी निविदा प्रक्रि या राबवली जात आहे. १८ नंबर फलाटाबाहेर रेल्वेची मोठी मोकळी जागा असल्याने त्या जागेतच ही संकल्पना राबवली जाणार आहे. – शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 2:29 am

Web Title: csmt railway sation restaurant on wheels akp 94
Next Stories
1 स्वयंअर्थसहाय्य तत्त्वावर शाळा सुरू
2 करोना खर्चाचा हिशोब देण्यास प्रशासनाची टाळाटाळ
3 बेस्ट, रेल्वेतील १२३ करोनायोद्ध्यांचा मृत्यू
Just Now!
X