परळ, करी रोड नवीन पादचारी पुलांचे काम

मध्य रेल्वेवरील परळ आणि करी रोड येथील लष्कराकडून उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलांसाठी गर्डर टाकण्याचे काम ४ फेब्रुवारी (रविवार) रोजी केले जाणार आहे. या कामांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते दादपर्यंत अप जलद मार्गावर सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत, तर डाऊन जलद आणि अप व डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० पर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे ब्लॉक काळात सीएसएमटी ते दादपर्यंत लोकल फेऱ्या होणार नाहीत, तर दादरपासूनच पुढे कल्याण, कर्जत, कसारासाठी लोकल गाडय़ा चालविण्यात येतील.

ब्लॉक सुरू होण्यापूर्वी

’ दादर स्थानकात सीएसएमटीला जाणारी शेवटची जलद लोकल सकाळी ८.१२ वाजता येईल

’ दादर स्थानकात सीएसएमटीला जाणारी शेवटची धिमी लोकल सकाळी ९.०० वाजता येईल

’ सीएसएमटीहून शेवटची धिमी लोकल सकाळी ९.०५ वाजता सुटेल.

’ सीएसएमटीहून शेवटची जलद लोकल सकाळी ९.१२ वाजता सुटणार आहे.

ब्लॉकनंतरच्या लोकल फेऱ्या

’ दादर स्थानकात सीएसएमटीला जाणारी पहिली धिमी लोकल दुपारी ३.३५ वाजता येईल.

’ दादर स्थानकात सीएसएमटीला जाणारी पहिली जलद लोकल दुपारी ४.३८ वाजता येईल.

’ सीएसएमटीहून पहिली जलद लोकल दुपारी ३.४० वाजता सुटेल.

’ सीएसएमटीहून पहिली धिमी लोकल दुपारी ३.५० वाजता सुटेल.

ब्लॉक काळात अपच्या दिशेने येणाऱ्या लोकल दादर, कुर्लापर्यंतच चालविण्यात येतील आणि याच स्थानकातून काही लोकल फेऱ्या सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हार्बर आणि ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. या मार्गावरील लोकल गाडय़ा सुरळीत राहतील.

३ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आलेल्या गाडय़ा

’ कोल्हापूर-सीएसएमटी सह्य़ाद्री एक्स्प्रेस

’ नागपूर-सीसएमटी सेवाग्राम एक्स्प्रेस

४ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आलेल्या गाडय़ा

’ ट्रेन ११००९ आणि ११०१० सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस

’ ट्रेन २२१०१ आणि २२१०२ सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस

’ ट्रेन १२१२३ आणि १२१२४ सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस

’ ट्रेन १२१०९ आणि १२११० सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस

’ ट्रेन १२१२५ आणि १२१२६ सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस

’ ट्रेन १२१३९ सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस

’ ट्रेन ११०२३ सीएसएमटी ते कोल्हापूर सह्य़ाद्री एक्स्प्रेस

पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

सिग्नल, ओव्हरहेड इत्यादी कामांसाठी येत्या रविवारी गोरेगाव ते अंधेरीदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत, तर सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पाचव्या मार्गावर ब्लॉकचे काम चालेल. ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील लोकल गाडय़ा धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.

’ २ फेब्रुवारी रोजी सुटलेली हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणे स्थानकापर्यंतच चालविण्यात येईल.

’ ३ फेब्रुवारी रोजी सुटणारी चेन्नई-सीएसएमटी एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंतच चालविण्यात येईल.

’ ३ फेब्रुवारी रोजी सुटणारी वाराणसी-सीएसएमटी महानगरी एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंतच.

’ ३ फेब्रुवारी रोजी सुटणारी हैदराबाद-सीएसएमटी एक्स्प्रेस कल्याण स्थानकात काही वेळ थांबविल्यानंतर सीएसएमटीसाठी रवाना होईल.