वाशी खाडीवरील पुलासाठी निविदा प्रक्रिया सुरू; दोन मेट्रो मार्गालाही उन्नत मार्गाची जोडणी

मुंबई : गेल्या आठ वर्षांपासून नुसतीच चर्चा होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)ते पनवेल जलद उन्नत मार्गाला अखेर गती देण्यात येत आहे. वाशी खाडीवरूनही उन्नत मार्ग जाणार असल्याने त्यासाठी स्वतंत्र पूल उभारण्यात येईल. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याची माहिती एमआरव्हीसीचे(मुंबई रेल्वे विकास महामंडळ) व्यवस्थापकीय संचालक रवी शंकर खुराना यांनी दिली. या मार्गाला दोन मेट्रो मार्गाशीही जोडण्यात येणार आहे.

1878 summer special trains from Western Railway and 488 from Central Railway
पश्चिम रेल्वेवरून १,८७८ आणि मध्य रेल्वेवरून ४८८ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या
Kulaba Bandra Seepz, Metro 3
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून अल्प दिलासा, ‘कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात
dombivli police marathi news, police died after falling from moving local train marathi news
कोपर रेल्वे स्थानकाजवळ पोलिसाचा लोकलमधून पडून मृत्यू
loksatta analysis two new roads between mumbai to goa
मुंंबई – गोवा दरम्यान लवकरच दोन नवीन महामार्ग… आणि १३ विकास केंद्रे… कसे असतील हे प्रकल्प?

सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्गाला २००९-१० साली रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली. त्यानंतर एमआरव्हीसीने याचा प्रस्ताव बनवून रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविल्यानंतर २०१६ साली त्यालाही मंजुरी देण्यात आली. मात्र प्रकल्पाला स्वतंत्र मंजुरी घेऊन आणखी विलंब करण्यापेक्षा त्याचा एमयूटीपी-३ ए मध्ये समावेश केला आणि गेल्या फेब्रुवारी २०१८ मध्ये पुन्हा एकदा अर्थसंकल्पातून मंजुरी मिळाली. प्रकल्पात ११ स्थानके येणार असून सीएसएमटी ते पनवेल असा धिम्या मार्गावर ७५ मिनिटांचा प्रवास ४५ मिनिटांत होणार आहे. उन्नत मार्ग बांधताना केवळ ३० टक्के भाग सध्याच्या हार्बर मार्गावरून जाईल, तर प्रकल्पातील अन्य मार्गासाठी जमीन संपादन करावी लागणार असून त्यासाठी राज्य सरकार आणि सिडकोचे सहकार्य लागणार असल्याचे सांगण्यात आले. प्रकल्पाच्या खर्चाचा वाटा वर्ल्ड बँकेबरोबरच राज्य आणि केंद्र सरकारही उचलणार आहे.

उन्नत मार्ग वाशी खाडीवरूनही जाणार असल्याने त्यासाठी पूल उभारण्यात येईल. या पुलासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती खुराना यांनी दिली. हा मार्ग मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला जोडतानाच मेट्रोलाही जोडण्यात येणार आहे. मानखुर्द येथे प्रस्तावित मेट्रो मार्गाशी, तसेच नेरूळ येथेदेखील मेट्रोशी जोडणी देण्यात येईल. ११ हजार कोटीच्या या प्रकल्पात १२६० कोटी खर्चातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विशेष मार्गिका बांधण्यात येणार आहे. पनवेलसाठी दर तीन मिनिटाला तर विमानतळासाठी दर ८.६ मिनिटाला एक ट्रेन सोडण्याची योजना आहे.

एमआरव्हीसीच्या एमयूटीपी (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट)-३ ए मध्ये सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून रेल्वे बोर्डाकडेही पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.