News Flash

परवानगी मिळूनही सांस्कृतिक संस्था बंदच

कर्मचाऱ्यांच्या आणि प्रेक्षकांच्या प्रवासावर निर्बंध आहेत.

कार्यक्रमांना अचानक परवानगी मिळाल्याने त्यांच्या नियोजनासाठी अवधी मिळालेला नाही.

पुन्हा बंधने वाढण्याची भीती, गैरसोयीची वेळ, नियोजनासाठी कालावधी आवश्यक

मुंबई : गेल्या साधारण दीड वर्षानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळाली असली तरीही सांस्कृतिक विश्व पूर्वपदावर येण्यास आणखी काही काळ जाणार आहे. पुन्हा बंधने वाढण्याची भीती, गैरसोयीची वेळ, नियोजनासाठी लागणारा कालावधी इत्यादी कारणांमुळे अद्याप सांस्कृतिक संस्था सुरू झालेल्या नाहीत.

‘सरकारी नियम सतत बदलत राहतात. गेल्या वेळी एकदा परवानगी मिळाली म्हणून नाट्यगृह उघडले. लाखभर रुपये खर्च करून नाटक बसवले; मात्र पुन्हा निर्बंध आल्याने फारसे प्रयोग झाले नाहीत. आता पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनावर खर्च के ल्यास पुन्हा निर्बंध येण्याची भीती आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या आणि प्रेक्षकांच्या प्रवासावर निर्बंध आहेत. त्यामुळे इतक्यात तरी साहित्य संघ उघडणार नाही’, अशी माहिती साहित्य संघाच्या नाट्यशाखेचे प्रमोद पवार यांनी दिली.

‘अमर हिंद मंडळा’ने ‘वसंत व्याख्यानमाला’ आणि वक्तृ त्व स्पर्धेचे आयोजन ऑनलाइन के ले होते; मात्र आता परवानगी मिळाल्याने महिना अखेरीस हे कार्यक्रम प्रत्यक्ष घेण्याचा विचार के ला जात आहे. ‘दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रा’चे बरेचसे कार्यक्रम संध्याकाळी होतात. सध्या दुपारी ४ वाजेपर्यंतच कार्यक्रम करण्यास परवानगी मिळाली आहे. शिवाय विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा शनिवार, रविवारी घेतल्या जातात. नेमकी त्याच दिवशी कार्यक्रम करण्यास परवानगी नाही. त्यामुळे सध्या संस्था ऑनलाइन कार्यक्रमांवरच अवलंबून आहे.

‘कार्यक्रमांना अचानक परवानगी मिळाल्याने त्यांच्या नियोजनासाठी अवधी मिळालेला नाही. त्यामुळे कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांच्या तारखा मिळेपर्यंत कार्यक्रम होऊ शकणार नाहीत’, असे ‘लोकमान्य सेवा संघा’चे कार्यवाह महेश काळे यांनी सांगितले. ‘महाराष्ट्र सेवा संघा’ने आपले ग्रंथालय सुरू के ले असले तरीही अद्याप तेथे सांस्कृतिक कार्यक्रम झालेला नाही.

आर्थिक आव्हान

टाळेबंदीत विस्कटलेली आर्थिक घडी पूर्ववत करण्याचे आव्हान सांस्कृतिक संस्थांपुढे आहे. राज्य नाट्य स्पर्धेसाठी साहित्य संघाने जागा भाड्याने दिली होती. त्याचे अर्धेच भाडे मिळाले आहे. संस्थेच्या कलाकारांना स्पर्धेत मिळालेल्या पारितोषिकांची रक्कम अजून मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कसे द्यायचे, असा प्रश्न संस्थेसमोर आहे. संस्थेने आर्थिक मदतीचे आवाहन के ले होते. याला सामान्य प्रेक्षकांचा काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. संस्थेच्या भालेराव कु टुंबीयांनीच ६ लाख रुपये उभे के ले. त्यात समितीतील इतर सदस्यांनी ४ लाखांची भर घातली. ‘अमर हिंद मंडळा’ने लग्नाच्या सभागृहाचे भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:13 am

Web Title: cultural institutions closed despite permission akp 94
Next Stories
1 पोलीस नाईक रेहाना शेख यांचे सर्वत्र कौतुक
2 लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी कायम
3 विभागीय शुल्क समित्या स्थापन, मात्र पालकांना दिलासा नाहीच!
Just Now!
X