News Flash

आजपासून जमावबंदी

सध्या लागू असलेले निर्बंध १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले आहेत.

रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत निर्बंध, उपाहारगृहे रात्री ८ वाजता बंद

मुंबई : करोनाचे रुग्ण वाढल्याने राज्यात आज, रविवारी मध्यरात्रीपासून १५ एप्रिलपर्यंत सर्वत्र रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत एकत्र येण्यास बंदी आहे. उपाहारगृहे, मॉल्स, चित्रपटगृहे, सागरी किनारे, बगीचे, उद्याने रात्री ८ वाजताच बंद करण्यात येतील.

करोनाचे रुग्ण वाढल्याने कडक निर्बंध लागू करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार शुक्र वारी जमावबंदीची घोषणा करण्यात आली होती. त्याची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार १५ एप्रिलपर्यंत राज्यात रात्रीची जमावबंदी लागू असेल. या काळात रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत निर्बंध लागू असतील. पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. दंडाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. उपाहारगृहे, सिनेमागृहे, सभागृह यांनी नियमभंग केल्यास त्यांना करोनाची साथ संपेपपर्यंत टाळे ठोकण्याचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सर्व जिल्हा, पालिका आणि पोलीस प्रशासनास दिले आहेत.

मुंबईसह महानगर प्रदेश तसेच पुणे महानगर प्रदेश, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आदी जिल्ह्यात करोनाचा उद्रेक होत असल्याच्या पाश्र्वाभूमीवर राज्यात पुन्हा एकदा टाळेबंदी करण्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडून होत आहे. सरसकट टाळेबंदी लागू के ली जाणार नसली तरी काही निर्बंघ नव्याने लागू करण्यात आले आहेत. सध्या लागू असलेले निर्बंध १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर टाळेबंदीसारखे कठोर निर्बंध किं वा तत्सम कठोर उपाययोजना करण्याची मुभा जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना देण्यात आली आहे. मुख्य सचिवांची लेखी परवानगी घेऊनच संचारबंदी किं वा टाळेबंदीसारखे निर्बंध लागू करता येतील, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

डॉक्टरांवर बंधने

करोनाबाधितावर घरीच उपचार सुरू असल्यास ते स्थानिक प्रशासनाला कळविण्याचे बंधन डॉक्टरांवर असेल. गृह विलगीकरणातील करोनाबधित रुग्णांची काळजी घेण्याचे बंधन डॉक्टरांवर असेल. रुग्णाने गृह विलगीकरणाचा भंग के ल्यास ते प्रशासनाला कळविण्याचे बंधन डॉक्टरांवर असेल.

हातावर शिक्का, दरवाजावर पाटी

गृह अलगीकरणात राहणाऱ्यांच्या हातावर शिक्का मारण्याबरोबरच दरवाजावर पाटी लावण्याच्या तसेच कु टुंबातील अन्य व्यक्तींनाही घरातच सक्तीने राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई के ली जाणार आहे.

रेल्वे सेवेवर परिणाम नाही

मुंबई परिसरात रेल्वे प्रवासावर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. यामुळे सर्वसामान्य नागरिक रेल्वेतून प्रवास करू शकतील. तसेच जिल्ह्यातंर्गत किं वा आांतरजिल्हा प्रवासावरही कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. काही जिल्हाधिकाऱ्यांनी तशी मागणी के ली होती, परंतु सरकारने  प्रवासावर कोणतेही निर्बंध लागू के लेले नाहीत.

देशात ६२,२५८ नवे बाधित

नवी दिल्ली : देशात गेल्या एक दिवसात आणखी ६२,२५८ जणांना करोनाचा संसर्ग झाला. हा या वर्षीचा एका दिवसातील रुग्णसख्येचा उच्चांक आहे. देशभर  देशातील करोनाबाधितांची संख्या आता एक कोटी १९, ८,९१० वर पोहोचली. देशात गेल्या २४ तासांत करोनाने २९१ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे शनिवारी देण्यात आली.

खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती

  •  वैद्यकीय क्षेत्रातील तसेच अत्यावश्यक सेवेतील वगळून सर्व खासगी कार्यालये आणि सरकारी, निमसरकारी कार्यालयांध्येही ५० टक्के  उपस्थितीचे बंधन.
  •   लोकप्रतिनिधी वगळता खासगी व्यक्तींना सरकारी कार्यालयात पास, किंवा बैठकीचे निमंत्रण असल्याशिवाय प्रवेश देण्यास मज्जाव.
  •   धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होणार नाही याचा विचार करून एका तासाला किती भाविकांना प्रवेश द्यायचा याचा निर्णय घेण्याचे अधिकार धार्मिक स्थळ व्यवस्थापनांना.
  • सार्वजनिक वाहनांमध्ये नियमभंग करणाऱ्यांना ५०० रूपये दंड करणार

नवे निर्बंध

  •  सर्व उपाहारगृहे, सिनेमागृहे, मॉल, नाट्यगृहे, सभागृह, रात्री ८ वाजता बंद होतील.
  •  उपहारगृहांना घरपोच किं वा उपाहारगृहातून खाद्यपदार्थ घेऊन जाण्याची मुभा कायम.
  •  लग्न सोहळ्यासाठी जास्तीतजास्त ५०, तर अंत्यसंस्करासाठी २० लोकांना परवानगी.
  •  नियमांचे उल्लंघन केल्यास सिनेमागृहे, उपाहारगृहे, मंगलकार्यालये किं वा नाट्यगृहांना साथ संपेपर्यंत टाळे. मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश.
  • राज्यात सर्वत्र सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी, सांस्कृतिक सभागृहातही कार्यक्रम घेण्यास मज्जाव

तर हजार रुपये दंडवसुली

करोना प्रतिबंधक नियमाचा भंग करणाऱ्यांकडून प्रतिव्यक्ती एक हजार रुपये दंड वसूल केला जाईल. गृह विलगीकरणातील रुग्णांची जबाबदारी प्रथमच डॉक्टरांवर सोपविण्यात आली असून, रुग्णाने या नियमाचा भंग के ल्यास ते प्रशासनाला कळविण्याचे बंधन डॉक्टरांवर घालण्यात आले आहे.

संसर्ग रोखण्यासाठी पंचस्तरीय योजना

नवी दिल्ली : बारा राज्यांत करोनाचा प्रादुर्भाव खूप वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या राज्यांच्या अधिकाऱ्यांशी दूरसंवाद माध्यमातून बैठक घेऊन पंचस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केली. कुठलेही नियम पाळले जात नसल्यामुळे संसर्ग टाळण्याकरिता कठोर कृतीची गरज आहे. प्रभावी प्रतिबंधात्मक क्षेत्रे तयार करून संपर्क शोधमोहीम किमान १४ दिवस ४६ जिल्ह्यांत राबवली गेली पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटू शकेल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

 

राज्यात ३५,७२६ नवे रुग्ण

मुंबई :  राज्यात दिवसभरात ३५,७२६ नवे रुग्ण आढळले असून, करोनामुळे १६६ जणांचा मृत्यू झाला.  गेल्या २४ तासात मुंबई ६१३०, नाशिक २४२२, पुणे शहर ३५२२, पिंपरी-चिंचवड १६८७, उर्वरित पुणे जिल्हा १३८२, नांदेड शहर ७०२, नागपूर शहर २६७५, उर्वरित नागपूररु जिल्हा १०६६, जळगाव १०७२, पनवेल ४४८, ठाणे शहर ९३९, कल्याण-डोंबिवली ८५९ नवे रुग्ण आढळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 2:22 am

Web Title: curfew from today corona virus infection corona test today corona virus akp 94
Next Stories
1 राज्यभर तापदाह
2 अग्निसुरक्षेबाबत सगळीकडेच अनास्था
3 ‘शिवनेरी’कडे प्रवाशांची पाठ
Just Now!
X