News Flash

राज्यात जमावबंदी कायम मुदत ३० सप्टेंबपर्यंत वाढवली

या आदेशातून अत्यावश्यक सेवा आणि टाळेबंदी शिथिल करताना शासनाने मुभा दिलेल्या व्यक्ती, सेवा, व्यवसायांना सूट असेल

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई पोलिसांनी गुरुवारी शहरातील जमावबंदीची मुदत ३० सप्टेंबपर्यंत वाढवली. या आदेशातून अत्यावश्यक सेवा आणि टाळेबंदी शिथिल करताना शासनाने मुभा दिलेल्या व्यक्ती, सेवा, व्यवसायांना सूट असेल. पोलिसांनी जारी केलेल्या आदेशामुळे संपूर्ण टाळेबंदी, संचारबंदी जारी होणार, असा गैरसमज पसरल्याने काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांच्यासह मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून या आदेशान्वये नवी बंधने लादण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले.

या आदेशान्वये नवी कोणतीही बंधने लादण्यात आलेली नाहीत, असे मुंबई पोलीस आयुक्त परमबिरसिंह, पोलीस दलाच्या प्रवक्त्या एन. अंबिका यांनी स्पष्ट केले. आदित्य यांनीही संध्याकाळी ट्वीटद्वारे अस्वस्थ होण्याचे काहीच कारण नाही. मुंबई पोलिसांनी ३१ ऑगस्टला जारी केलेल्या आदेशाची मुदत ३० सप्टेंबपर्यंत वाढविली आहे. आधीच्या आणि आताच्या आदेशांमध्ये काही बदल नाहीत, नवे र्निबध नाहीत, असे स्पष्ट केले.

अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय आणीबाणीसह अत्यावश्यक सेवा आणि शासनाची परवानगी असलेल्या व्यक्तींना संचारबंदीचे नियम लागू नसतील. शासनाने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल केली. या प्रत्येक टप्प्यात ठराविक सेवा, व्यवसायांना मर्यादीत प्रमाणात मुभा दिली. शासनाने मुभा दिलेल्या सेवा, व्यवसायाशी संबंधीत व्यक्ती पुर्वीप्रमाणेच प्रवास करू शकतील, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:16 am

Web Title: curfew in the state was extended till september 30 abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सेवाव्रतींना आश्वासक दाद
2 आजपासून जोरदार पावसाचा अंदाज
3 मुखपट्टय़ा, सॅनिटायझरचे दर लवकरच निम्म्यावर!
Just Now!
X