मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईदरम्यान १.९९ कोटी रूपये किंमतीचे जप्त करण्यात आले. मस्कतहून आलेल्या जेट एअरवेज विमानातून तस्करी करून हे सोने भारतात आणण्यात आले होते. जेट एअरवेजच्या ९ डब्लू-५३९ विमानातून आलेल्या प्रवाशाने विमानातील प्रसाधनगृहात सोने लपवून ठेवल्याचे चौकशीनंतर उघडकीस आल्याचे, विशेष अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार मुंबई विमानतळावर जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत तब्बल २५० किलो सोने तस्करी करताना पकडण्यात आले आहे.