मुंबईतील सायकल मार्गिका निरुपयोगी; वाहतूक नियोजनाच्या कारणाखाली अनेक ठिकाणी मार्गिका बंद

दक्षिण मुंबईत काही आठवडय़ांपूर्वी सुरू झालेला एनसीपीए ते वाळकेश्वर सायकल ट्रॅक, नाताळचे निमित्त साधत सोमवारी परळ येथील मैदानात उद्घाटन झालेला दीड किलोमीटरचा ट्रॅक आणि भविष्यात तानसा जलवाहिनीशेजारी होऊ घातलेला सायकलचा ३९ किलोमीटरचा विशेष मार्ग.. वाहनांच्या प्रदूषणाने घुसमटलेल्या मुंबईत गेल्या काही महिन्यांतील सायकल ट्रॅकचे उपक्रम कितीही दिलासादायक वाटले तरी शहरातील सायकल मार्ग हे केवळ हौसेपुरतेच राहणार असून वाहतुकीचे साधन म्हणून सायकलचा वापर करणे नजीकच्या भविष्यातही दुरापास्तच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित
Mumbai Metro Introduces Wristband Ticketing for Metro 1 Route No Need for Paper or Mobile Tickets
‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी आता मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकिट सेवा कार्यान्वित
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य

तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या मुंबईच्या रस्त्यांची लांबी, रुंदी वाढवणे अशक्य असले तरी गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या मात्र सातत्याने वाढत आहे. हवेत धूर सोडून प्रदूषण करणाऱ्या चारचाकी गाडय़ांऐवजी पर्यावरणस्नेही असलेल्या सायकलसाठी रस्त्यांवर विशेष मार्गिका द्यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू होती. या मागणीला अनुसरून सोमवारी परळमधील उद्यानात १२०० मीटर लांबीच्या सायकल ट्रॅकचे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उद्घाटन केले. सुमारे आठ एकर जागा असलेल्या या उद्यानात जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला सायकल ट्रॅक करण्यात आला आहे. स्थानिकांनी विशेषत: मुलांनी इथे सायकल चालवण्याचा आनंद घ्यावा, असा उद्देश आहे, असे एफ दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर देसाई यांनी सांगितले. उद्यानात मुलांना सायकल चालवण्याचा आनंद घेता येणार असला तरी मुंबईच्या रस्त्यांवर सायकल चालवणे दुरापास्तच आहे. पालिकेने नवा प्रयोग करत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण मुंबईतील एनसीपीए ते वरळी यादरम्यान रस्त्यावर ११ किलोमीटरचा विशेष ट्रॅक तयार केला. मात्र पहिल्याच रविवारी वाहतूक पोलिसांनी अरुंद पेडर रोड आणि वाहतूक कोंडीचे कारण देत हा ट्रॅक वाळकेश्वपर्यंत म्हणजे साडेपाच किलोमीटर ट्रॅकलाच परवानगी दिली. महत्त्वाचे म्हणजे हा सायकल ट्रॅकही केवळ रविवारीच सकाळी ६ ते ११ वाजेदरम्यानच सुरू राहणार असल्याने सायकलस्वारी ही केवळ आनंदापुरती राहणार आहे.

वांद्रे येथील काही रहिवासी संस्थांनी सायकल ट्रॅकसाठी गेली काही वर्षे पाठपुरावा केला होता. वांद्रे येथील कार्टर रोडवर गेल्या डिसेंबर महिन्यात प्रायोगिक तत्त्वावर दीड किलोमीटरचा मार्ग सायकलसाठी ठेवण्यात आला. मात्र महिन्याभरात या ट्रॅकसाठी ठेवलेले बॅरिकेड्स चारचाकी गाडय़ांनी उडवले. वाहतूक कोंडीचे कारण देत हा मार्ग रद्द करण्यात आला, अशी माहिती स्थानिक नगरसेवक असिफ झकेरिया यांनी दिली. वांद्रे येथेही येत्या काही महिन्यांत बॅण्डस्टॅण्ड व कार्टर रोडवर रविवारपुरते सायकल ट्रॅक करण्यात येणार आहेत. मात्र त्यांचाही उपयोग केवळ लहान मुलांना मनोरंजनासाठी होईल. वाहतुकीचे साधन म्हणून सायकल वापरण्याबाबत महापालिका गंभीर नाही. वांद्रे स्टेशनजवळ असलेल्या बस आगारात सायकल स्टॅण्ड करून सायकल भाडय़ाने देण्याचा प्रस्ताव स्थानिकांनी दिला होता. मात्र त्याबाबतही पुढे काही झाले नाही, असे झकेरिया म्हणाले.

दक्षिण मुंबईप्रमाणेच प्रत्येक वॉर्डमध्ये सायकल ट्रॅकसाठी जागा शोधण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या असल्याने पुढील काही महिन्यांत शहराच्या विविध भागांत असे ट्रॅक सुरू होण्याची शक्यता आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीशेजारील झोपडय़ा हटवून दोन्ही बाजूंना जॉगग ट्रॅक व सायकल ट्रॅक उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना पार पडल्यास मुंबईत तब्बल ३९ किलोमीटरचा सायकल ट्रॅक उपलब्ध होईल, मात्र त्याचा उपयोगही केवळ सायकल स्पर्धा आणि मनोरंजनापुरता राहणार आहे.