25 February 2021

News Flash

Cyclone Nisarga: मुंबईमधील विधानभवन परिसरात झाडे पडली; रस्त्यांवर फांद्या, लाकडांचा खच

झाडे बाजूला काढण्याचं काम सुरु

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरात ‘निसर्ग चक्रीवादळा’ने धडक दिली आहे. या वादळाने दुपारी दोनच्या सुमारास समुद्रातून भूप्रदेशावर प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. या वादळाचा परिघ ६० किमीपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. निसर्ग वादळाचा परिणाम मुंबईवरही दिसून येत आहे. मुंबईमधील अत्यंत महत्वाचा भाग असलेल्या विधानभवन परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठी वृक्ष उन्मळून पडली आहे. विधानभवन परिसराकडून मंत्रालयाकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा झाडे आहेत. त्यापैकीच चार मोठी झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत.

विधानभवन परिसर हा मुंबईमधील प्रशासकीय इमारती, मोठ्या बँका तसेच महत्वाची खासगी कार्यालये असणारा परिसर आहे. समुद्रकिनाऱ्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या परिसामध्ये वेगाने वारे वाहत आहे. विधानभवनाकडून विधानभवन मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरील चार मोठी झाडे दुपारच्या सुमारास उन्मळून पडल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. रस्त्यावर झाडांच्या फांद्या आणि लाकडांचा खच पडल्याचे चित्र दिसत आहे.

नक्की पाहा >> Photos: ‘निसर्गा’च्या भीतीने कधीही न थांबणारी मुंबई थांबली

या परिसरामध्ये पडलेली झाडं रस्त्यावरुन बाजूला काढून अत्यावश्यक सेवेमधील वाहतूक पुन्हा सुरु करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी कामाला लागले आहेत. येथील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाऱ्यामुळे झाडं पडली तेव्हा सुदैवाने रस्त्यावर कोणीही नव्हते. त्यामुळे यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच वांद्रे वरळी सी लिंकवर कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीला परवानगी देण्यात येणार नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत आपात्कालिन परिस्थिती उद्भवल्यास खबरदारीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे. आपातकालीन परिस्थिती उदभवल्यास त्याचा सामना करण्यासाठी मुंबईत अग्निशमन दलाला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच मुंबईतील सहा समुद्र किनाऱ्यांवर ९३ जीवरक्षकांना तैनात करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 2:40 pm

Web Title: cyclone nisarga live updates tree fall in vidhanbhavan area mumbai scsg 91
Next Stories
1 चक्रीवादळाचा मोर्चा तीन तासांमध्ये मुंबई, ठाण्याकडे – IMD
2 निसर्ग चक्रीवादळ : वांद्रे वरळी सी लिंकवर वाहतुकीला परवानगी नाही
3 ‘निसर्ग’चा धोका लक्षात घेऊन राणीच्या बागेतील प्राण्यांचा करण्यात आला ‘असा’ बचाव
Just Now!
X