News Flash

पाणीपुरीच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट

उल्हासनगर कॅम्प क्र. ५ मधील नेताजी चौक परिसरातील प्रभू दर्शन इमारतीमधील पाणीपुरीच्या दुकानात शनिवारी पहाटे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन दुकानाचा चक्काचूर झाला.

| October 6, 2014 01:46 am

उल्हासनगर  कॅम्प क्र. ५ मधील नेताजी चौक परिसरातील प्रभू दर्शन इमारतीमधील पाणीपुरीच्या दुकानात शनिवारी पहाटे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन दुकानाचा चक्काचूर झाला. या स्फोटामुळे ही इमारत खचली असून परिसरातील इमारतींनाही तडे गेले आहेत.
नागरिक साखर झोपेत असताना हा भीषण स्फोट झाल्यामुळे काही वेळ नागरिकांना स्फोट कसला झाला हे कळले नाही. प्रभू टॉवर इमारतीत १३ कुटुंबे राहतात. तळमजल्याला व्यापारी गाळे आहेत. त्यामध्ये हरीश लुल्ला यांचे पाणीपुरीचे दुकान आहे. रात्री दुकान बंद करून ते घरी गेले. दुकान बंद करताना ते सिलेंडरचे रेग्युलेटर बंद करायचे विसरले असावेत. त्यामुळे खोलीत गॅस जमा झाला व त्याचा स्फोट झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. लुल्ला यांच्या दुकानावरील घराला भगदाड पडले आहे. दुकानाची इमारत कोसळली आहे. पिलरना तडे व खचले आहेत. दुकानातील सगळे सामान जळून खाक झाले आहे. नेताजी चौक परिसरात स्फोटाचा आवाज घुमल्याने नागरिक भयभीत झाले होते. दुकानदारावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2014 1:46 am

Web Title: cylinder blast in pani puri stall in kalyan
टॅग : Cylinder Blast
Next Stories
1 चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान आज जम्बो मेगाब्लॉक
2 कोळसा टंचाईचे संकट गहिरे!
3 फलकांना चाप; लावणारे मात्र मोकाट
Just Now!
X