News Flash

सायरस मिस्त्रींनी कंपनीचे मोठे नुकसान केले: टीसीएस

मिस्त्री यांनी कंपनी आणि समभागधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (टीसीएस) या कंपनीने ‘टाटा अॅण्ड सन्स’च्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलेले सायरस मिस्त्री यांच्यावर निशाणा साधला आहे. मिस्त्री यांनी कंपनी आणि समभागधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर केलेल्या अहवालात टीसीएसने मिस्त्रींनी नुकसान केल्याचे नमूद केले आहे.

टीसीएसच्या अहवालानुसार, टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर मिस्त्री यांनी अनेक खोटे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे टाटा सन्ससह बोर्डाच्या संचालकांचीही प्रतिमा मलिन झाली. तसेच टाटा समूहाचेही मोठे नुकसान झाले आहे. टीसीएस ही कंपनी या समूहातील एक कंपनी आहे. टीसीएसने बीएसईकडे सादर केलेल्या अहवालात पुढील सर्वसाधारण सभेच्या आयोजनाबाबतही कळवले आहे. कंपनीची सर्वसाधारण सभा १३ डिसेंबरला होणार आहे, असे कळवण्यात आले आहे.

यापूर्वी टीसीएस कंपनीने मिस्त्री यांच्या जागी इशात हुसैन यांची संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. याआधी टाटा सन्सने पदावरून हटवलेल्या अध्यक्षांनी सर्व कंपन्यांच्या पदावरून राजीनामा द्यायला हवा, असे म्हटले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2016 7:06 pm

Web Title: cyrus mistry caused enormous harm to tata group tcs
Next Stories
1 विजय मल्ल्याच्या अडचणी वाढल्या, कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट
2 आयएनएस चेन्नई भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल
3 ‘तारखा वाटप’साठी नाटय़निर्माता संघाची स्वतंत्र समिती
Just Now!
X