News Flash

महाविद्यालयातील विद्यार्थिनींची दबंगगिरी

महाविद्यालयातील मुलांची फिल्मी स्टाईल मारामारीची प्रकरणे नेहमीच घडत असतात. माटुंगा किंग्ज सर्कल येथील एसएनडीटी महाविद्यालयात मात्र विद्यार्थिनीनींच ‘दबंगगिरी’ केल्याचे उघडकीस आले आहे. तीन विद्यार्थिनीनीं आपल्या

| February 14, 2013 04:25 am

वर्गमैत्रिणीला मारहाण
महाविद्यालयातील मुलांची फिल्मी स्टाईल मारामारीची प्रकरणे नेहमीच घडत असतात. माटुंगा किंग्ज सर्कल येथील एसएनडीटी महाविद्यालयात मात्र विद्यार्थिनीनींच ‘दबंगगिरी’ केल्याचे उघडकीस आले आहे. तीन विद्यार्थिनीनीं आपल्या कॉलेजबाहेरच्या मित्राच्या मदतीने आपल्याच वर्गमैत्रिणीला बेदम मारहाण केली. या विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
अस्मिता शेट्टी (१७) माटुंग्याच्या एसएनडीटी महाविद्यालयात ११ वी कला शाखेत शिकते. तिच्या वर्गातील तीन मैत्रिणींनी तिच्याकडे वार्षिक प्रकल्प मागितला होता. तो देण्यास तिने नकार दिला होता. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास महाविद्यालयाबाहेर अस्मिता आली असता या तीन मैत्रिणींनी तिला अडवले. सोबत त्यांचा एक मित्रही होता. ‘प्रकल्प का दिला नाही’, असा जाब विचारत या चौघांनी अस्मिताला मारहाण करण्यास सुरुवात केली. चौघांनी आपल्याला लाथा बुक्क्यांनी तुडविल्याचे अस्मिताने सांगितले. मारहाण केल्यानंतर चौघेही तिला रस्त्यात टाकून पळून गेले. अस्मिताच्या मित्रांनी तिला उपचारांसाठी शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना सुरुवातीला महाविद्यालयातील मुलांची भांडणे समजून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले होते. परंतु बुधवारी संध्याकाळी त्यांनी या तीन मैत्रिणी आणि त्यांच्या मित्राविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या तिघींनी अस्मिताच्या खासगी भागास हेतूपरस्सर इजा पोहोचविल्याचा आरोप तिच्या मित्रांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 4:25 am

Web Title: dabanggiri of ladies student of collage
Next Stories
1 सात वर्षांच्या मुलीस कोंडून ठेवल्याप्रकरणी चौघांना अटक
2 मलनि:सारण वाहिनी साफ करणाऱ्या तीन कामगारांना वायुबाधा
3 दोन तरुणांची नवी मुंबईत आत्महत्या
Just Now!
X