News Flash

दादरच्या शिवाजी पार्कचं नाव बदललं, तब्बल ९३ वर्षांनी नामकरण

नामविस्ताराचा प्रस्ताव बुधवारी महापालिका सभेत मंजूर करण्यात आला

दादरची ओळख असणाऱ्या शिवाजी पार्क मैदानाचं नाव बदलण्यात आलं आहे. शिवाजी पार्क मैदानाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं करण्यात आलं आहे. नामविस्ताराचा प्रस्ताव बुधवारी महापालिका सभेत मंजूर करण्यात आला. यानिमित्ताने तब्बल ७३ वर्षांनी शिवाजी पार्क मैदानाचं नाव बदलण्यात आलं. ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या शिवाजी पार्क मैदानात अनेक राजकीय सभा पार पडल्या असून अनेक क्रिकेटपटूही या मैदानावर घडले आहेत.

मूळ माहीम पार्क अशी ओळख असणाऱ्या या उद्यानाचं १० मे १९२७ रोजी शिवाजी पार्क असं नामकरण करण्यात आलं होतं. मैदानावर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. लोकवर्गणीतून हा पुतळा १९६६ रोजी उभारण्यात आला होता. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बुधवारी महासभेत या मैदानाचा नामविस्तार करण्याचा ठराव मांडला. सर्वपक्षीयांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी ठरावाला मंजुरी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 3:53 pm

Web Title: dadar shivaji park ground renamed as chhatrapati shivaji maharaj park sgy 87
Next Stories
1 खासदार जयसिद्धेश्वर स्वामींना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा
2 करोना रोखण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज!
3 विदर्भ-मराठवाडय़ावर अर्थसंकल्पात अन्याय
Just Now!
X