News Flash

अरुण गवळीची दगडी चाळ होणार इतिहासजमा; म्हाडा उभारणार ४० मजली टॉवर

दगडी चाळमधील सर्व १० इमारतींचा पुनर्विकास होणार

अंडरवर्ल्ड डॉन ते राजकारण असा प्रवास करणाऱ्या अरुण गवळीचं मुंबईतील निवास्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दगडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार आहे. म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्विकास मंडळ (MBRRB)अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी ही माहिती दिली आहे. दगडी चाळमधील सर्व १० इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. यामधील आठ इमारती अरुण गवळीच्या मालकीच्या असून इतर दोन इमारतीही त्याच्या कुटुंबाने विकत घेतल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

“पुनर्विकासासाठी लवकरच बिल्डरला ना हरकत प्रमाणपत्र दिलं जाईल. दरम्यान भाडेकरुंसाठी इरादा पत्र मंजूर झालं आहे. त्याआधी एमबीआरआरबी पात्र भाडेकरुंची यादी तयार करणार आहे,” असंही घोसाळकर यांनी सांगितलं आहे.

प्राथमिक योजनेनुसार दगडी चाळीच्या जागी ४० मजली दोन टॉवर उभारण्यात येणार आहेत. यामध्ये मूळ भाडेकरुंसाठी घरं असतील आणि उर्वरित घरं विक्रीसाठी उपलब्ध असतील. दगडी चाळीत एकूण ३३८ भाडेकरु असून अरुण गवळी संपत्तीचा मालक आहे. अरुण गवळीने पुनर्विकासाठी म्हाडाकडे प्रस्ताव पाठवला होता. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर म्हाडाकडून प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त

“सध्या एमबीआरआरबीला या प्रकल्पात किती घऱं मिळतील हे निश्चित नाही. इरादा पत्र हे फक्त पहिलं पाऊल आहे. नंतर यामध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे,” असं घोसाळकर यांनी सांगितलं आहे. १० इमारतींमध्ये प्रत्येकी चार मजले असून यामधील दोन इमारती धोकादायक असल्याने आधीच पाडण्यात आल्या आहेत. यामुळे प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत त्या मोकळ्या जागेत भाडेकरुंसाठी तात्पुरती राहण्याची सोय केली जाईल.

अरुण गवळीमुळे दगडी चाळ प्रसिद्ध असून शिवेसना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी सध्या तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याला नागपूर जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एप्रिल महिन्यात त्याला ४५ दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 4:57 pm

Web Title: dagdi chawl to go under redevelopment by mhada sgy 87
Next Stories
1 “P-305 दुर्घटना मानवनिर्मितच, मोदी सरकार चुकांमधून कधी शिकणार?” काँग्रेसचा गंभीर आरोप!
2 विरार : करोना केंद्रातून पळालेल्या करोनाबाधिताचा आढळला मृतदेह!
3 “महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”
Just Now!
X