Dahi Handi 2018: ‘गोविंदा रे गोपाळा’ असे म्हणत थरारवर थर रचणारी पथके, डिजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात मुंबई आणि राज्यभरात विशेषतः मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळत आहे. मात्र, उच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध आणि पोलिसांची कारवाई, अशा परिस्थितीमुळे आज, सोमवारी साजऱ्या होणा-या दहीहंडी उत्सवात दरवर्षीपेक्षा थरांची स्पर्धा कमी झालेली पाहायला मिळत असली तरी उत्साह मात्र कमी झालेला नाही. विशेष म्हणजे  ठाण्यातील  मनसेची २१ लाख रुपयांची दहीहंडी जोगेश्वरीतील जय जवान या गोविंदा पथकाने फोडली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात राजकीय हंड्यांपासून सामाजिक हंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यातही ठाण्यातील हंड्या दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडळांना आकर्षित करत आहेत. शहराचा विचार करता भायखळा, गिरगाव, वरळी, लालबाग, दादर, माहीम, प्रभादेवी, माटुंगा आणि धारावी परिसरात राजकीय नेत्यांसह मंडळांच्या हंड्या गोविंदांचे लक्ष वेधून घेत आहेत.

जाणून घेऊया दहीहंडीबाबतचे सर्व अपडेट्स –

Live Blog

22:38 (IST)03 Sep 2018
पुणे : वरळीच्या गोविंदांनी फोडली 'सुवर्णयुग'ची ४० फुटी दहिहंडी

पुणे : गोविंदा आला रे आला... च्या जयघोषात मुंबईतील वरळीच्या शाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या गोविंदांनी बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी ६ व्या थरावर फोडली. सोमवारी रात्री ९ वाजून ०७ मिनिटांनी अवघ्या दुस-या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले.



21:28 (IST)03 Sep 2018
मुंबईत विविध भागांत १२१ गोविंदा जखमी

मुंबईत विविध भागांत एकूण १२१ गोविंदा दहिहंडीचे मनोरे रचताना जखमी झाले असून यांपैकी २५ जणांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरु आहेत. तर ९५ जणांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. तर एकाचा सायन रुग्णालयात मृत्यू झाला आहे. शहरातील सायन (२), टाटा (२), राहेजा (१) आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात ४ जणांना दाखल करण्यात आले आहे. तर, पूर्व भागातील अग्रवाल (३), राजावाडी (१), महात्मा फुले रुग्णालय (१). पश्चिम भागात कुपर रुग्णालय (१), ट्रॉमा केअर रुग्णालयात १ गोविंदांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

20:45 (IST)03 Sep 2018
घाटकोपरमध्ये वरुण धवनने धरला ठेका
19:42 (IST)03 Sep 2018
मुंबईत विविध भागांत ८६ गोविंदा जखमी

मुंबईत विविध भागांत एकूण ८६ गोविंदा दहिहंडीचे मनोरे रचताना जखमी झाले असून ३७ जणांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरु आहेत. यांपैकी ४८ जणांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. तर एकाचा सायन रुग्णालयात मृत्यू झाला आहे. शहरातील सायन (१), केईएम (९), नायर (१), जी. टी. (१), राहेजा (१) आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात ४ जणांना दाखल करण्यात आले आहे. तर, पूर्व भागातील अग्रवाल (१), राजावाडी (१), महात्मा फुले रुग्णालय (१), शताब्दी (२). पश्चिम भागात देसाई (४), बांद्रा भाभा रुग्णालय (५), ट्रॉमा केअर रुग्णालयात ४ गोविंदांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

19:30 (IST)03 Sep 2018
दिल्लीच्या इस्कॉन मंदिरात भाविकांचा जल्लोष
19:14 (IST)03 Sep 2018
राज्यात विकासाचा थर लावू -मुख्यमंत्री फडणवीस

भाजपा आमदार राम कदम यांच्या घाटकोपरमधील दहीहंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लावली. यावेळी राज्यात आपल्याला विकासाचा थर लावायचा आहे, असे  ते म्हणाले.

18:42 (IST)03 Sep 2018
प्रो गोविंदाच्या दहीहंडीला विघ्नहर्ता मंडळाची पहिली सलामी

प्रो गोविंदाच्या दहीहंडीला विघ्नहर्ता मंडळाने  पहिली सलामी देण्याचा प्रयत्न केला.

18:27 (IST)03 Sep 2018
भ्रष्टाचाराची हंडी फोडू या- मुख्यमंत्री

भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्या फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  उपस्थिती दर्शविली होती. त्यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराची हंडी फोडूयात असं म्हटलं.

18:23 (IST)03 Sep 2018
आकडी आल्यामुळे अंकुश खंदारे थरावरुन कोसळला होता

उपचारादरम्यान मृत पावलेला अंकुश खंदारे हा तरुण  धारावीतील बाळ गोपाळ पथकाचा गोविंदा होता. दहीहंडी फोडण्यासाठी लावण्यात आलेल्या पहिला थरावर चढताना आकडी आल्यामुळे अंकुश खाली कोसळला होता.

18:08 (IST)03 Sep 2018
उपचारादरम्यान २७ वर्षीय गोविंदाचा मृत्यू

२७ वर्षीय अंकुश खंदारे या गोविंदाचा सायन रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान  मृत्यू झाला आहे.

18:01 (IST)03 Sep 2018
जय जवान पथकाने फोडली ठाण्यातील मनसेची दहीहंडी

जोगेश्वरीतील जय जवान या गोविंदा पथकाने ठाण्यातील मनसेची २१ लाखांची दहीहंडी फोडली आहे.

17:30 (IST)03 Sep 2018
भाजपा आमदार राम कदम यांच्या दहीहंडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

भाजपा आमदार राम कदम यांच्या घाटकोपरमधील दहीहंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

17:16 (IST)03 Sep 2018
जखमी गोविंदांच्या संख्येत वाढ

काही वेळापूर्वी मुंबईमध्ये दहीहंडी फोडताना ३६ गोविंदा जखमी झाले होते. मात्र आता या जखमींच्या संख्येत वाढ होत जखमींचा आकडा ६० वर पोहोचला आहे. जखमींपैकी ४० गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

17:13 (IST)03 Sep 2018
ठाण्यातील दहीहंडीला खा. राजन विचारे यांची हजेरी

ठाण्यातील  दहीहंडीचा उत्साह वाढविण्यासाठी खा. राजन विचारे यांची उपस्थिती

17:05 (IST)03 Sep 2018
ठाण्यात साईराम गोविंदा पथकाची सलामी

ठाण्यात नौपाडा परिसरात साईराम गोविंदा पथकाची आठ थरांची सलामी

16:40 (IST)03 Sep 2018
जखमी गोविंदांना दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयांची नावे

जखमी गोविंदा -३६,  रुग्णालयात दाखल करण्यात आलेले गोविंदा -१८  (जे.जे-१,  के. ई.एम -२, नायर -२, एम.टी.अग्रवाल -२, राजडावाडी -२,  महात्मा फुले-१, व्ही.एन.देसाई - १,  बांद्रा भाभा हॉस्पिटल -३, एस.के.पाटील-२, पोतदार -२ ) सर्वांची प्रकृती स्थिर

16:17 (IST)03 Sep 2018
ठाण्यात मनसेच्या दहीहंडीत राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती

ठाण्यात मनसेच्या दहीहंडीत राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती

16:09 (IST)03 Sep 2018
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जय जवानच्या गोविंदांनी ९ थर रचले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जय जवानच्या गोविंदांनी ९ थर रचले

15:44 (IST)03 Sep 2018
केरळ पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत

केरळ पूरग्रस्तांसाठी  मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची आर्थिक मदत

15:32 (IST)03 Sep 2018
दहीहंडीसाठी मुख्यमंत्री ठाण्यात पोहोचले

ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आहेत.    

15:16 (IST)03 Sep 2018
दहीहंडीसाठी मुख्यमंत्री थोड्याच वेळात ठाण्यात

ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात ठाण्यात दाखल होणार आहेत

15:10 (IST)03 Sep 2018
मुंबईत आतापर्यंत ३६ गोविंदा जखमी

मुंबईमध्ये दहीहंडी फोडताना दुपारी २ वाजेपर्यंत ३६ गोविंदा जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 36 'govindas' have been injured till 2pm in Mumbai during Dahi-Handi celebrations. #Janmashtami — ANI (@ANI) September 3, 2018

14:38 (IST)03 Sep 2018
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्येही जन्माष्टमीचा उत्साह

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्येही जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळाला

14:00 (IST)03 Sep 2018
सर्व जखमी गोविंदांची प्रकृती स्थिर

ठाण्यात दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या आकाश माळी (वय -16) वर व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान आतापर्यंत सहा गोविंदा जखमी असून जेजे हॉस्पिटलमध्ये एक गोविंदा तर केईएम हॉस्पिटलमध्ये तीन, एमटी अग्रवालमध्ये एक आणि एन. देसाई हॉस्पिटलमध्ये एका गोविंदावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

13:36 (IST)03 Sep 2018
मुंबईत सहा गोविंदा जखमी

दहीहंडी फोडताना मुंबईमध्ये ठिकठिकाणी आतापर्यंत सहा गोविंदा जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

12:59 (IST)03 Sep 2018
ठाण्यात एक गोविंदा जखमी, रुग्णालयात दाखल

ठाण्यामध्ये दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात एक गोविंदा जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

12:46 (IST)03 Sep 2018
ठाणे : शिवतेज महिला गोविंदा पथकाचे सहा थर

ठाण्यात मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये शिवतेज महिला गोविंदा पथकाने यशस्वीपणे सहा थर लावून सलामी दिली

12:42 (IST)03 Sep 2018
पनवेलमध्ये पारंपारीक पद्धतीने दहीहंडी साजरी

पनवेलमधील अनेक गावांमध्ये शेकडो वर्षांची परंपरा कायम ठेवत पारंपारीक पद्धतीने दहीहंडी साजरी करण्यात आली.

12:37 (IST)03 Sep 2018
डोंबिवली: दहीहंडीला 'मराठी बिग बॉस'च्या कलाकारांची उपस्थिती

डोंबिवलीमध्ये दहीहंडीला 'मराठी बिग बॉस'च्या कलाकारांची उपस्थिती

12:33 (IST)03 Sep 2018
ठाणे : भगवती शाळेच्या पटांगणात मनसेतर्फे आयोजित दहीहंडीस जल्लोषात सुरुवात

मनसेतर्फे ठाण्याच्या भगवती शाळेच्या पटांगणात आयोजित दहीहंडीला जल्लोषात सुरूवात झाली आहे

12:12 (IST)03 Sep 2018
अमृतसरमध्ये जन्माष्टमीचा उत्साह

अमृतसरच्या श्वाला मंदिरात भाविकांनी जन्माष्टमीनिमित्त गर्दी केली आहे.

12:09 (IST)03 Sep 2018
डोंबिवली: राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीचा थरार

डोंबिवलीमध्ये राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. 

11:57 (IST)03 Sep 2018
मथुरेतील कृष्ण मंदिरात सुरक्षा वाढवली

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेतील कृष्ण मंदिरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

11:03 (IST)03 Sep 2018
दादरमध्ये साई राम मंडळाच्या गोविंदा पथकाची ८ थरांची यशस्वी सलामी

मुंबईः दादरच्या रानडे रोड येथे साई राम मंडळाच्या गोविंदा पथकाने यशस्वीपणे ८ थर लावून सलामी दिली

10:57 (IST)03 Sep 2018
सचिन तेंडुलकरने दिल्या शुभेच्छा

भारतरत्न सचिन तेंडुलकर याने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

10:51 (IST)03 Sep 2018
मुंबईच्या मंडळांची ठाण्याच्या हंड्यांकडे कूच

मुंबईतल्या दादर आणि परिसरातील अनेक मंडळांनी आपआपल्या मंडळाची हंडी फोडून सलामी दिल्यानंतर आता  ठाण्यातल्या मोठ्या हंड्या फोडण्यासाठी कूच केली आहे. 

10:41 (IST)03 Sep 2018
अमिताभ बच्चन यांनी दिल्या शुभेच्छा

अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

10:16 (IST)03 Sep 2018
मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

10:13 (IST)03 Sep 2018
देशभरात कृष्णजन्माष्टमीचा उत्साह

देशभरात कृष्णजन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी श्री कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा हा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला असून मथुरा, द्वारकेसह मुंबईतील इस्कॉन मंदिरात रात्रीपासून भाविकांनी गर्दी केली आहे.

10:09 (IST)03 Sep 2018
जन्माष्टमीनिमित्त जुहू येथील इस्कॉन मंदिरात भाविकांची मोठी गर्दी.

जन्माष्टमीनिमि मुंबईच्या जुहू येथील इस्कॉन मंदिरात भाविकांची मोठी गर्दी.(छायाचित्र - दिलीप कागडा)

'गोविंदा रे गोपाळा' असे म्हणत थरारवर थर रचणारी पथके, डिजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात मुंबई आणि राज्यभरात विशेषतः मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळत आहे.