News Flash

बँकॉकमधील नृत्य कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेला निधी कलावंतांकडून परत

मुख्यमंत्री मदत निधीतून जाहीर करण्यात आलेला आठ लाखांचा निधी कलावंतांकडून परत

येत्या डिसेंबर महिन्यात बँकॉक येथे होणाऱया नृत्यस्पर्धेसाठी मुख्यमंत्र्यांनी आठ लाखांचा निधी मंजूर केल्याचे माहिती आणि अधिकार कार्यकर्ते अनिल गगलानी यांनी दाखल केलेल्या याचिकेत स्पष्ट झाले होते.

बँकॉकमध्ये होणाऱया शासकीय नृत्यस्पर्धेसाठी मुख्यमंत्री मदत निधीतून जाहीर करण्यात आलेला आठ लाखांचा निधी कलावंतांनी परत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री मदत निधीतून शासकीय नृत्यस्पर्धेसाठी निधी देण्याच्या निर्णयावर टीकेला सुरूवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या डिसेंबर महिन्यात बँकॉक येथे होणाऱया नृत्यस्पर्धेसाठी मुख्यमंत्र्यांनी आठ लाखांचा निधी मंजूर केल्याचे माहिती आणि अधिकार कार्यकर्ते अनिल गगलानी यांनी दाखल केलेल्या याचिकेत स्पष्ट झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या मंजूरीनंतर हा निधी सचिवालय जिमखाना या खासगी संघटनेच्या खात्यात जमादेखील करण्यात आला होता. मात्र, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर तोंडसुख घेण्यास सुरूवात केली. राज्य सरकारला दुष्काळापेक्षा नृत्य स्पर्धेला निधी देणे महत्त्वाचे वाटत असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. अखेर सचिवालय जिमखाना या संघटनेअंतर्गत या स्पर्धेत सहभागी होणाऱया कलाकारांनी आज मुख्यमंत्र्यांचा निधी परत करत असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, सरकारच्या निर्णयात काही अयोग्य नसून १९६७ साली अस्तित्वात आलेल्या मुख्यमंत्री मदत निधीतून सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी निधी देण्याचीही तरतूद असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 12:34 pm

Web Title: dancers returns cm help fund for dance troupe thailand visit
Next Stories
1 छोटा राजनकडे ४००० ते ५००० कोटींची संपत्ती
2 इंद्राणी मुखर्जीला डेंग्यू झालेला नाही – वैद्यकीय अहवाल
3 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ‘पाणीपुरवठा संजीवनी’ योजना
Just Now!
X