News Flash

दाऊदच्या ‘अमीना मेन्शन’ इमारतीचा लिलाव

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या आणखी एका मालमत्तेचा गुरुवारी लिलाव करण्या

दाऊद इब्राहिम ( संग्रहीत छायाचित्र )

मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या आणखी एका मालमत्तेचा गुरुवारी लिलाव करण्यात आला. लिलावात पाकमोडिया स्ट्रीट येथील अमीना मेन्शन ही इमारत सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेन्ट ट्रस्टने (एसबीयूटी)साडेतीन कोटी रुपयांना घेतली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे लिलाव प्रक्रिया पार पडली. याआधीही ट्रस्टने दाऊदच्या मालमत्ता लिलावात घेतल्या आहेत. मालमत्तांची जप्ती आणि त्यानंतरची लिलाव प्रक्रिया रोखण्यासाठी दाऊदच्या कुटुंबीयांकडून बरेच प्रयत्न केले गेले. मात्र सर्वोच्च न्यायलयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर लिलाव प्रक्रियेने वेग घेतला. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात फेमा कायद्यान्वये दाऊदच्या मालमत्तांचा ११ कोटींना लिलाव करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 1:01 am

Web Title: dawood ibrahim building amina mansion auction
Next Stories
1 नाक मुरडूनही शिवसेना भाजपबरोबरच!
2 Maharashtra Bandh: हिंसेखोरांकडून नुकसान भरपाईची मागणी करणारी उच्च न्यायालयात याचिका
3 Maharashtra Bandh: मराठा आंदोलकांची माणुसकी, रस्त्यात अडकलेल्यांना भरवला घास
Just Now!
X