अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक करण्यात आली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. ‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका बिल्डरकडे इकबाल कासकरने खंडणी मागितली होती. ज्यानंतर या बिल्डरने पोलिसांकडे तक्रार केली. याच प्रकरणी इकबाल कासकरला अटक करण्यात आली.

कोण आहे इकबाल कासकर?

इकबाल कासकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा लहान भाऊ आहे

बिल्डर्स आणि जमीन मालकांना धमकावणे, त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे असे आरोप त्याच्यावर आहेत

मार्च २००३ पर्यंत इकबाल कासकर दुबईत वास्तव्य करत होता

मार्च २००३ मध्ये इकबाल कासकर भारतात परतला तेव्हा त्याला विमानतळावरच अटक करण्यात आली होती

कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने २००७ मध्ये त्याची सुटका करण्यात आली होती

जून २०१० मध्ये छोटा राजन गँगने इकबाल कासकरला ठार मारण्याचाही कट आखला होता मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला