पोलीस हद्दीच्या वादामुळे कुचंबणा
ठाणे रेल्वे आणि कोपरी पोलिसांमध्ये अजूनही हद्दीवरून वाद सुरू असल्याचे बुधवारी पुन्हा एकदा उघड झाल़े  या वादामुळेच एक बेवारस मृतदेह सुमारे पाच तास घटनास्थळीच पडून होता. रेल्वे पोलिसांनी नेहमीप्रमाणेच आपल्या हद्दीत ही घटना घडली नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे अखेर कोपरी पोलिसांनी या घटनेची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील कल्याण बाजूस असलेल्या रेल्वे पुलाखाली बुधवारी पहाटे एक बेवारस मृतदेह आढळला. याबाबत माहिती मिळताच ठाणे रेल्वे पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले. पण, ही घटना आपल्या हद्दीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी कोपरी पोलिसांना पाचारण केले.
दरम्यान, या संदर्भात  ठाणे रेल्वे पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी, हद्दीत ही घटना कोपरी पोलीस ठाण्याच्या घडल्याचे सांगितले. तर पोलीस ठाण्याच्या हद्दीवरून कोणताही वाद झाला नसल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.