News Flash

रेल्वेचा मुर्दाडपणा ! मृतदेहाची मुंबई लोकलमधून फरफट, रुग्णवाहिकेअभावी ६ तास मृत्यूशी झुंज

रेल्वेच्या धडकेत आणि रेल्वे प्रशासनाच्या मुर्दाडपणामुळे एका व्यक्तीचा नाहक जीव गेल्याची घटना

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या धडकेत आणि रेल्वे प्रशासनाच्या मुर्दाडपणामुळे एका व्यक्तीचा नाहक जीव गेल्याची घटना घडली आहे. एक्सप्रेसच्या धडकेत दिवा ते तळोजादरम्यान जखमी झालेल्या व्यक्तीचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू झाला. असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे या व्यक्तीच्या मृतदेहाची दिवा-ठाणे लोकलमधून फरफट करण्यात आली. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर टीका होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवा ते तळोजास्थानकादरम्यान रविवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कोकणकन्या एक्स्प्रेसच्या धडकेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती रेल्वे प्रशासनाला रात्री अडीच वाजताच मिळाली. पण, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचं सांगत घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतरही रात्री 2.30 ते सकाळी 6.30 वाजेपर्यंत प्रशासनाने काहीच पावलं उचलली नाहीत. परिणामी उपचाराअभावी या व्यक्तीचा मृत्यू झाला. कहर म्हणजे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही मृतदेहाची परवड सुरुच होती. सकाळी साडेआठ वाजता खचाखच गर्दीने भरलेल्या दिवा-ठाणे लोकलमधून मृतदेह ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला. सर्वप्रथम सकाळी सहाच्या सुमारास दिव्यातून जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला इमर्जन्सी हॉल्ट देऊन हमाल आणि रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. तिथे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतरही रुग्णवाहिकेच्या अभावी पुन्हा दिवा स्थानकात परत येण्यासाठी रोहा-दिवा पॅसेंजरची वाट पाहावी लागली, आणि अखेर सकाळी साडेआठ वाजता मृतदेह दिवा स्थानकात आणला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 5:07 pm

Web Title: dead body of a man who was hit by konkankanya express taken from mumbai local train
Next Stories
1 घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहचवा-उद्धव ठाकरे
2 भूखंड घोटाळ्याप्रकरणी परभणीच्या माजी खासदाराला अटक
3 नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा कहर, एकाचा मृत्यू
Just Now!
X