मोहिंदरसिंग काबुलसिंग शाळेसमोर २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह रविवारी रात्री सापडला. तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला असल्याने हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईत जे. जे. रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.
बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस रात्रीची गस्त घालत असताना हा प्रकार उघडकीला आला. अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आली असण्याचा पोलिसांना संशय आहे.
ठाण्यात हत्या
प्रतिनिधी, ठाणे : गायमुख भागात मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चेंबरमध्ये लोकेश पवार या नागरिकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी खारेगाव भागातून रवी झारपला, रवी पिऱ्या चव्हाण यांना अटक केली. लोकेश आंध्र प्रदेशातून कळवा येथे आले होते. ते बेपत्ता झाल्याने कळवा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती.