News Flash

मालाडमध्ये बॅगेत आढळला तरुणीचा मृतदेह

हत्या झाल्याचा संशय असून कारण अद्याप अस्पष्ट

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबईच्या मालाड परिसरात एका बॅगमध्ये मृतदेह आढळला आहे. अशाप्रकारे दिवसाढवळ्या मृतदेह आढळला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह एका तरुणीचाा आहे. हत्या झाल्याचे प्राथमिक अंदाजात वर्तविण्यात आले असून नेमके कारण काय याबाबत अद्याप समजले नाही. मालाड पूर्वेकडील लिंक रोड परिसरात ही घटना घडली आहे. माईंड स्पेस ऑफीसजवळ ही बॅग सापडली आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. याआधीही मालाडमध्ये प्लॅटफॉर्मच्याजवळ मृतदेहाचा सांगाडा सापडला होता. त्यानंतर आता ही घटना घडल्याने परिसरात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

ही महिला २० ते २५ वर्षे वयाची असल्याचा अंदाज आहे. तिला शवविच्छेदनासाठी सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये नेले असून पोलीसांनी आरोपीला अटक केले आहे. आरोपीने महिलेला शरीरसुखाची मागणी करण्यासाठी घरी बोलावले. यासाठी त्याने ऑनलाईन पद्धतीने पैसे भरले होते. पण या तरुणीने घरी आल्यानंतर आणखी पैसे देण्याची मागणी केल्यावर त्याने तिच्या डोक्यात मारले. त्यावेळी तिचा जागीच मृत्यू झाला. मग त्याने घरातील सुटकेसमध्ये तिचा मृतदेह भरला आणि कॅब सेवा पुरवणाऱ्या कारमधून ती बॅग घेऊन तो निघाला. ही बॅग त्याने रस्त्यात फेकून दिली. कारचालकाला ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांना हा प्रकार कळवला. कॅब चालकाकडे आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळाल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांना सोपे झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 7:04 pm

Web Title: dead body of girl found in bag malad mumbai
Next Stories
1 नवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर
2 ‘जलयुक्त शिवार’मधील भ्रष्टाचारावर राज ठाकरेंचा ‘मास्टरस्ट्रोक’
3 रेल्वेचा मुर्दाडपणा ! मृतदेहाची मुंबई लोकलमधून फरफट, रुग्णवाहिकेअभावी ६ तास मृत्यूशी झुंज
Just Now!
X